काही गोष्टी कधीच बदलत नाहीत, सूर्य का कधी त्याची दिनक्रिया चुकवतो.. तसेच चंद्र, दिवस रात्र यांचे. अन जोपर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत रामायण महाभारत असतील. च्यायला ! काही दिवसांपूर्वी जर हे वाक्य मी लिहिले असते तर अनेकांनी भुवया उंचावल्या असत्या. पण जी गोष्ट ३३ वर्षांपूर्वी झाली तीच गोष्ट टीवीवर पुन्हा झाली.

कारण तब्बल  33 वर्षानंतर पुन्हा प्रसारित झालेल्या "रामायण" ने जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेला करमणूक कार्यक्रम बनून जागतिक विक्रम नोंदविला आहे. ३३ वर्षांपूर्वी अशा रेकॉर्ड्सचे फ्याड नवते अन मोजणारी यंत्रणाही नवते. २०१९ च्या मे महिन्यात म्हणे "गेम ऑफ थ्रोन्स" च्या अंतिम भागाला जवळपास पावणे दोन कोटी लोकांनी एकाचवेळी पहिले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोणा व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर लवकरच दूरदर्शन नॅशनलवर टीव्ही शोचे पुन्हा प्रसारण सुरू झाले. रामायण पूर्वीइतकेच घराघरात पहिले गेले. डीडी नॅशनलने 16 एप्रिल रोजी सांगितले की जगभरातील 77 दशलक्ष (7.7 कोटी) लोकांनी हा एपिसोड पाहिला.

दूरदर्शनवरील रामायणाचे पुनर्प्रकाशन जगभरातील प्रेक्षकांच्या नोंदी फोडत आहे, हा शो 16 एप्रिल रोजी जगातील सर्वाधिक 7.7 कोटी दर्शकांसह करमणूक कार्यक्रम बनला आहे,”  अस डीडी नॅशनल यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केले. अर्थात ३३ वर्षांपूर्वी याहीपेक्षा जास्त लोकांनी हि मालिका पहिली होती यात शंकाच नाही.


Post a Comment

Previous Post Next Post