कोरोना व्हायरससारखे संकट जगाने गेल्या शंभर वर्षात पहिले नसावे. या महामारीने लोकांना फक्त घरातच बसावयास लावले नसून अनेकांच्या नोकऱ्यासुद्धा संकटात आणल्या आहेत. निसर्ग बदला घेतोय का, यावेळी सव्याज माणसाने जे काही निसर्गाला दिलय त्याची परतफेड करायचा तर निसर्गाचा विचार नाही ना? अन अशेच इशारे तर निसर्ग आपल्याला देत तर नाहीये ना !! आजचा हा लेख कोरोनाबद्दल नाहीये, पण कोरोनाशी त्याचा संबंध मात्र आहे.

उत्तर अमेरिका खंडात, अमेरिकेला खेटून एक देश आहे मेक्सिको (अर्थात राजकारणात अनेकदा हा देश अमेरिकाला खेटतोच) या देशात पाउस पडला, गारांचा पाऊस. आता तुम्ही म्हणाल गारांचा पाऊस पडला हि काय विशेष बाब. पण थांबा !! हा पाउस विशेष आहे, कारण या पावसात जे गारांचे गोळे पडले त्यांचा आकार कशासारखा आहे माहितीये का ? कोरोनाच्या विषाणूचा अवतार ठरावा असा या गारांचा आकार आहे. या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अन लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. सोशल मिडीयावर अनेक फोटो अन पोस्ट याबद्दल पडत आहेत.

रिपोर्ट्स नुसार मेक्सिको मधल्या न्युवो लियोन या राज्यामध्ये मोंटमोरेलोस या भागात गारांचा पाऊस पडला अन या गारांचा आकार चक्क करोनाव्हायरस सारखा होता. पण हवामान विभागाने सांगितले कि अशा आकाराच्या गारा पडणे हि काही विशेष अशी बाब नाही. बर्फाचे तुकडे आकाशातून पडताना विविध प्रकारे फिरतात त्यामुळे असा आकार येणे हि गोष्ट अवैज्ञानिक नाहीये.

Post a Comment

Previous Post Next Post