दुनियेतले तब्बल २१० देश आता कोरोना विषानुसोबत लढत आहेत. पण जगात एक असा देश आहे कि ज्याने कोरोनाला हरवले आहे. कोरोनाबद्दल एक चांगली बातमी आहे ती येतेय न्यूझीलंड मधून

 न्यूज़ीलैंड च्या प्रधानमंत्री जैकिंडा ऑर्डर्न यांनी घोषणा केली आहे कि त्यांच्या देशाने कोरोना व्हायरस ला हरवले आहे. २७ एप्रिल ला तिथे फक्त ५ नवीन केसेस मिळाल्या आणि या व्हायरसने तिथल्या कम्युनिटी मधल्या फेजमध्ये कधीही प्रवेश केला नवता, हेच प्रमुख कारण आहे जेणेकरून आता प्रधानमंत्री हि घोषणा करू शकल्या. सोबतच त्यांनी आता लॉकडाउन ढिला सोडण्याची गोष्टही केली. जवळपास महिनाभर अत्यंत कठीण लॉकडाऊन पाळणाऱ्या देशात आता फक्त तीन बंदी राहतील. देशातले व्यवसाय,  टेकअवे फ़ूड आउटलेट आणि शाळाही उघडल्या जातील.


सोबतच अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी बांधकाम वैगरे कामांनाही मंजुरी दिली गेलीय, यामुळे ५ लाख लोक परत कामावर हजार होतील. सोशल डीस्टन्सींग मात्र कायम राहील. स्वास्थ विभागाने सांगितले आहे कि अस नाहीये कि पुढे केस येणार नाहीत, त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

न्यूज़ीलैंड मध्ये 1,472 लोकांना कोरोना झाला होता अन 19 जन यामध्ये मेले. आता फक्त 239 एक्टिव केस आहेत अन त्यामधील फक्त 1 माणूस गंभीर परिस्थिती मध्ये आहे. साल 2018 मधल्या अनुसार तिथे 48.9 लाख लोक राह्तर(पुण्याच्या निम्मे, अन आमच्या नगर जिल्यापेक्षा थोडे कमी). समुद्राने वेढलेल्या या बेटाला कमी लोकसंख्येमुळे कोरोनाला हरवणे सोपे गेले

 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने