प्रिया पूनिया नावाची एक खेळाडू भारतीय महिला क्रिकेट संघामधून खेळते, फलंदाजी, गोलंदाजी दोन्ही गोष्टी ती करते अर्थात तीच नाव हे आघाडीची अष्टपैलू नाव आहे. आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत तिने आपली अशी एक ओळख निर्माण केली आहे. पण भारत असा एक देश आहे, जिथे खेळाडू त्याच्या खेळाइतकाच त्याच्या लाईफस्टाईल, दिसणे, वागणे इत्यादींनी चर्चेत असतो.

याला प्रिया सुद्धा अपवाद नाही, आपल्या खेळाइतकेच प्रिया आपल्या सौदर्यांने चर्चेत राहत असते. तुम्हाला कदाचित विश्वास बसायचा नाही पण अगदी एखाद्या स्टार प्रमाणे प्रियाची लोकप्रियता आहे, तिचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. ती नेहमी तिने सुंदर सुंदर फोटो सोशल मिडीयावर टाकत असते अन फॅन्स या फोटोंवर लाईक्सचा वर्षावच करत असतात.


मैदानात एकाग्र अन सध्या लुकमध्ये दिसणारी प्रिया जेव्हा एखाद्या पार्टी, कार्यक्रमात दिसते तेव्हा तिचे राहणीमान विश्वास बसणार नाही इतके पालटलेले असते. या प्रसंगीचे तिचे फोटो पहिले तर आपण एखाद्या दक्षिणात्य अभिनेत्रीचे फोटो तर पाहत नाहीत ना असा भास व्हावा इतके ते सुंदर !. तिची क्रिकेट कारकिर्द नुकतीच सुरू झाली अन आपल्या पदार्पणाच्या खेळातच प्रियाने तब्बल 175 धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिका विरूद्धची ही खेळी क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत अर्थात अशा अनेक खेळ्या तिने कराव्यात अशीच अशा.

सुरेंद्र पुनिया नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याची प्रिया मुलगी. सरकारी अधिकारी अन बदली हे जणू समानार्थी शब्द !! त्यामुळे प्रियाला अनेक ठिकाणी शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे अजमेर, जयपूर, दिल्ली हि सगळी प्रीयाचीच गांवे तिची पदवी तिने दिल्ली इथे पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला यायच्या आधी ती जवळपास १० वर्षे सलामीची फलंदाज म्हणून खेळत होती. बंगळूरात झालेल्या सिनियर वूमन वनडे चॅम्पियनशिपमध्ये प्रियाने एकूण ८ मॅचेस मध्ये तब्बल ४०७ रन केले होते. या स्पर्धेमुळेच तिला न्यूझीलंड दौऱ्यासाठी चान्स मिळाला.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने