तुम्हाला स्टार प्रवाह वर येणारी 'देवयानी' मालिका आठवतेय. तुमच्यासाठी कायपण.. या डायलॉगने एकेकाळी प्रत्येक प्रेमवीराला वेड लावले होते. या मालिकेत देवयानीची भूमिका करणारी हिरोईन सध्या काय करत आहे माहिती आहे. देवयानी या मालिकेमध्ये भाग्यश्री मोटे इने प्रमुख भूमिका साकारली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्रचलित माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. घायाळ करेल अशा अदांनी तिने आपल्या चाहत्यांना वेड लावले आहे. आजकाल तिचा  रुपेरी पडद्यावर जास्त वावर दिसत नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. नुकताच भाग्यश्रीने तिचा एक बोल्ड अँड हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या अदा कुणालाही घायाळ करणाऱ्या आहेत. देवयानी नंतर भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झेप घेतली थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. या पाठोपाठ ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.

भाग्यश्रीच्या सौंदर्याने दाक्षिणात्य सिनेमाला गवसणी घातली नसती तर नवलच होते, तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही तिने पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने तमीळ चित्रपटातही भूमिका साकारली, या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारली आहे.  यापाठोपाठ भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post