अक्षय कुमार याचे करियर सध्या फुल स्पीडमध्ये आहे, त्याचे आयुष्यही अगदी सेट आहे. अक्षय अन ट्विंकल यांच्या लग्नाला तब्बल 19 वर्षे झाली आहेत. पण सुखी संसाराची हि 19 वर्षे घालावाण्याआधी अक्षय कुमारला कठीण प्रसंगामधून जावे लागले होते. सध्या लोकांना घरी बसून प्रसिद्ध व्यक्तींचे जुने किस्से, प्रसंग उकरून काढायची लहर आली आहे. सोशल मिडियातर अशा गोष्टींसाठी सर्वदा तयारच असते. अनेक अभिनेत्यांचे जुने किस्से सध्या ट्रेंडीग आहेत, तर यात अक्षय कुमार यांचे चाहते कसे मागे राहणार.

तुम्हाला कदाचित ऐकून नवल वाटेल पण का कुणास ठाऊक ट्विंकल यांची आई डिम्पल कपाडिया यांना अक्षय चक्क गे वाटायचा अन यामुळे अक्षय आणि ट्विंकलचा दोन वेळा साखरपुडा झाला आणि तो मोडला देखील होता. अमीर खान अन ट्विंकलचा मेला चित्रपट आठवतोय? जेव्हा मेला हा चित्रपट रिलीज होणार होता अशात अक्षयने ट्विंकलला प्रपोज केले. यावेळी ट्विंकलने अक्षयला सांगितले कि जर मेला फ्लॉप झाला तर मी तुझ्याशी लग्न करेल अन काय कमाल !! इतका चांगला चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला पण तरीही दोघांचे लग्न त्यावेळी काही झाले नाही.

म्हणे त्यावेळी ट्विंकलची आई डिंपलने लग्नाला नकार देत एक अट ठेवली होती त्यांनी अक्षय आणि ट्विंकलला लग्नाआधी एकत्र राहण्याची अट घातली होती. दोघांनीही (आनंदाने?) त्यांची ही अट मान्य केली. जेव्हा एक वर्ष पूर्ण झालं तेव्हा २००१ साली अक्षय आणि ट्विंकलचं लग्न झालं. लग्नाआधी हे दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना करण जोहरच्या कॉफी विथ करणया शोमध्ये आले होते तेव्हा त्यांनी हा किस्सा शेयर केला. ट्विंकलने सांगितले की तिची आई अक्षयला चक्क गे समजायची, तिला अक्षयवर यासाठी संशय होता कारण तिच्या एका पत्रकार मैत्रीणीने तिला असं सांगितलं होतं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने