चित्रपटसृष्टीत प्रसिद्धीची शिखरे पादाक्रांत केल्यावरही अनेकदा आपल्या अवघड वेळी कलाकारांचे जगणे मुश्कील झालेले दिसते. काही दिवसापूर्वी कादर खान यांचे फोटो फार व्हायरल झाले होते. त्याबातीत आम्ही अजूनतरी आपली मराठी चित्रसृष्टी सुदैवी मानत होतो पण दुर्दैवाने मराठीमध्येही एका आघाडीच्या नाईकेसोबत असच घडलंय. 'धुमधडाका' चित्रपट पहिला आहे, या चित्रपटात अशोक सराफ यांच्या नाईकेच काम केलेली अभिनेत्री आठवतेय ?? नाही. 'प्रीयतम्मा प्रीयतम्मा दे तू मला चुम्मा' ह गाणे तरी आठवत असेल ना !!

धुमधडाका, लक्ष्मीकांत बेद्रे यांच्यासोबत भटक भवानी या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री होती ऐश्वर्या राणे. ऐश्वर्या या सध्या खूप हलाखीचे जगणे जगतायेत. सध्या खूप हालाकीचे जीवन जगत आहेत. मराठी सोबत त्यांनी हिंदी चित्रपटांतसुद्धा काम केले होते. तर झाले असे धुमधडाका चित्रपट खूप गाजला, त्यानंतर ऐश्वर्या यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'मर्द' या सिनेमात काम करायची संधी मिळाली. संधी छोटीच होती, अमृता सिंग यांच्या डमीचे काम करायची पण हिंदी अन सोबत अमिताभ मोह कसा आवरणार !!

चित्रीकरणाच्या वेळी घोडसवारी करतानाच्या सीन मध्ये ऐश्वर्या घोड्यावर बसलेली होती तेव्हा अचानक घोड्याने तिला भीरकावलं. ऐश्वर्या जमिनीवर पडल्या, कसाबसा सीन पूर्ण झाला. पण या घटनेने त्यांना कमरेचे दुखणे दिले ते कायमचेच. पुढे हा त्रास खूप वाढला इतका कि कमरेखालचा भाग लुळा पडला. इलाजासाठी त्यांना दुबईला जावे लागले अन उपचारात सोबतचे सगळे संचित संपून गेले. मदतीसाठी खूप जनांसमोर हात पसरले पण कुणीही पुढे आले नाही. सध्या त्या कलाकारांना मिळणाऱ्या पेन्शनवर जगत आहेत.

काही दिवसांपूर्वी गावी जात असताना (राज्य बंदीमुळे) त्यांना पोलिसांनी अडवलं आणि पुन्हा आपल्या घरी जायला सांगितलं ह्या सगळ्यात त्यांनी आणलेले कपडे आणि सामानही चोरीला गेलं. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना जगणेदेखील मुश्किल झाले होते. कोणी काहीच मदत करत नाही त्यामुळे त्यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. आठवलेंनी ताबडतोब ऐश्वर्या राणे ह्यांना माझ्याच घरी रहा असा सल्ला दिला. जोवर सर्व परिस्थिती सुरळीत होत नाही तोवर तुम्ही आमच्याच परिवाराचा एक भाग आहेत आणि लागेल तेवढी मदत आम्ही करू असं सांगिल्यामुळे त्याही आठवले यांच्या घरीच राहत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post