अनिल कपूर अन श्रीदेवी यांचा सुपरहिट चित्रपट 'मिस्टर इंडिया' १९८७ साली प्रदर्शित झाला होता. बॉलीवूडमध्ये अस पहिल्यांदाच काहीतरी वेगळ रसायन बनले होते; अमरीश पुरी, श्रीदेवी, अनिल कपूर अन त्याच ते घड्याळ सगळच विलक्षण. पण या सगळ्यात एक चेहरा होता जिने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. चित्रपटात टीना नावाची एक मासूम... निरागस अशी मुलगी दाखवली आहे जिचे एका स्फोटामध्ये निधन होते. या सीनने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले होते.


मिस्टर इंडियामध्ये अनेक बालकलाकार होते, आफताब शिवदासनी यानेसुद्धा या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला आता ३३ वर्षे झाली, आफताबने अनेक चित्रपट केलेत तेव्हा टीना सुद्धा मोठी झालेली असेल आम्ही तिला शोधायचं म्हटलं. टीनाचे खरे नाव आहे 'हुजान खोदायिजी', मिस्टर इंडियानंतर ती चेन्नईला स्थाईक झाली अन आज ती मार्केटिंग क्षेत्रात काम करते. लिंटास म्हणून एक कंपनी आहे तिथे ऍडव्हरटायझिंग एक्सिक्युटिव्ह या पदावर आहे. आपल्या चित्रपटामुळे आजही तिला ओळखले जाते, कारण तिच्या भूमिकेमुळे श्रीदेवी स्वतः रडली होती अशी बातमीही सांगितली जाते.


Post a Comment

Previous Post Next Post