दगडी चाळ अन या चाळीचा प्रमुख अरुण गवळी याची मुलगी योगिता गवळी अन अभिनेता अक्षय वाघमारे यांनी आज दिनांक 8 मे २०२० रोजी संध्याकाळच्या मुहूर्तावर लग्न केले. त्यांच्या लग्नाचा सोहळा अपेक्षेप्रमाणे दगडी चाळीत पार पडला. कोरोना अन लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर अगदी मोजकीच मित्रमंडळी लग्नाला हजेरी लावलेली दिसली. गुरुवारी हळद अन मेहंदीचा प्रोग्राम पार पडला. या सोहळ्याचे फोटो अक्षयने आपल्या सोशल मिडीयावरून share केले. २०१९ च्या डिसेंबर मध्ये योगिता अन अक्षयचा साखरपुडा अगदी थाटात साजरा झाला होता.

याचवेळी २९ मार्च २०१९ हि लग्नाची तारीखही ठरली, पण लॉकडाऊन अन मुंबईतला कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे हे लग्न ठरलेल्या तारखेला होऊ शकले नाही. याबद्दल अक्षयने सांगितले कि २९ मार्चला लग्न होणार म्हणून आधीच तयारी झाली होती पण लॉकडाऊन मुले 8 मार्च रोजी आम्ही लग्न करणार आहोत. लग्नामध्ये सोशल डीस्टन्सींग अन फेस मास्क पाळण्यात आले व लग्नासाठी पोलिसांची परवानगी मागण्यात आली होती. लग्न छोटे राहणार असले तरी लॉकडाऊन संपल्यावर काही दिवसातच आम्ही रिसेप्शनचा सोहळा मोठ्या थाटात पार पाडणार असल्याचे त्याने त्यावेळी सांगितले होते. योगिता वाघमारे आणि अक्षय वाघमारे यांना यांच्या वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा!!!..

 


Post a Comment

Previous Post Next Post