रामायण मालिकेच्या जागी आता दूरदर्शन वरती अर्जुन एक गाजलेली ऐतिहासीक मालिका श्रीकृष्णा सुरु झाली आहे. मला आठवतंय रविवारची माझी सुरुवात या मालिकेने व्हायची, १९९३ साली हि मालिका सुरु झाली होती पण त्यावेळी कळावे असे वय नसल्याने या मालिकेचे रिपीट टेलिकास्टने माझे बालपण समृद्ध केले.

खास प्रेक्षकांच्या आग्रहाने या मालिकेचे रिपीट टेलिकास्ट केले गेले होते, या मालिकेत मराठमोळ्या स्वप्नील जोशीने तरुणपणीच्या (टीनएजर म्हणूयात का?) श्री कृष्णाची भूमिका साकारली होती. या मालिकेत अजून एक मराठमोळा कलाकार होता, अन त्याने बलरामाची भूमिका साकारली होती या अभिनेत्याने नाव दीपक देऊळकर ! या मालिकेने स्वप्नीलच्या कारकिर्दीची पायाभरणी केली.

कृष्ण आला कि राधा आलीच पाहिजे !! त्यावेळी राधाची भूमिकादेखील खूप गाजली होती. राधेची भूमिका हि साकारली होती ती श्वेता रस्तोगी नावाच्या अभिनेत्रीने. तिने अनेक तमिळ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. खून भरी मांगया हिंदी चित्रपटातदेखील तिची बालकलाकाराची भूमिका होती. भाई भैय्या और ब्रदर, थोडी सी जमीन थोडासा आसमान, वो रेहनेवाली मेहलो की, केसर, जय हनुमान, गणेश लीला, अलिफ लैला यासारख्या खूप मालीकेंमध्ये तिने अभिनय केला. अलिफ लैला या अत्यंत गाजलेल्या आणखी एका ९० च्या दशकातील मालिकेमधेही तिची भूमिका महत्वाची होती. मालिका ठरली त्यात तिला देखील महत्वाची भूमिका मिळाली होती. आज इतकी वर्षे लोटली तरी राधाची भूमिका साकारणारी श्वेता चाहत्यांच्या स्मरणात आहे तशा प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आजही त्या हिंदी मालिकांत पाहायला मिळतात इतकी वर्ष लोटली तरी स्वप्नील जोशी आणि श्वेता रस्तोगी चौधरी मालिकेत दिसायचे अगदी तसेच आजही दिसतात.

Post a Comment

Previous Post Next Post