कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला काय अन दूरदर्शनवर 'रामायण' आले काय, अन रामायणाने पुन्हा एकदा इतिहास घडवला काय. जगातील सर्वाधिक पहिली गेलेली मालिका म्हणजे रामायण पण रामायण मालिकेमुळे त्यातील कलाकारांच्या आयुष्यात लोकांना फारच स्वारस्य आले आहे. या मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका करणाऱ्या दारा सिंग यांचा असाच एक किस्सा समोर आलाय.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण रामायणात हनुमानाची भूमिका अजरामर करणारे दारा सिंग हे सुप्रसिद्ध कुस्तीपटू होते. अन ते काही साधेसुधे कुस्तीपटू नवते तर त्यांनी आपले नाव जागतिक राष्ट्रकुल स्पर्धेवरही कोरले होते. आपल्या वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांनी कुस्तीवर जीव लावला अन आघाड्यात घाम गाळला पण कुस्ती हा तरुणांचा खेळ तेव्हा त्यांनी नंतर कुस्तीतून निवृत्ती घेतली. पण भारदस्त शरीरयष्टी यामुळे त्यांना चित्रसृष्टी साद घालायला लागली, मुमताज यांच्या सह त्यांनी हिंदी चित्रपटात पदार्पण केले अन कुस्तीतले आखाडे गाजवणारा पैलवान पडद्यावर मोठमोठाले संवाद लीलया फेकायला लागला. संवाद फेकण्याबरोबरच चित्रपटांचे दिग्दर्शन अन लेखनही

दारा सिंह हनुमानाच्या भूमिकेसाठी अगदी योग्य कलाकार होते.हनुमानाच्या भूमिकेसाठी दुसरा कुणीही शोभला नसता. त्यांना यासाठी भारदस्त रक्कमही मिळाली, या भूमिकेसाठी त्यांना त्यावेळी 33 लाख रूपये मिळाले. आम्ही आपले गणिततज्ञ बसवले अन विचारले कि आजच्या काळातले हे किती रुपये असतील तेव्हा आमच्या तज्ञ मित्राने आकडेमोड करत सांगितले कि आजच्या काळातले तब्बल 20 कोटी रुपये इतकी रक्कम दारा सिंग यांना मिळाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post