बॉलीवूडचे सुपरस्टार अन ८० च दशक आपल्या रांगड्या अभिनयाने गाजवणारे धर्मेंद्र अजूनही आपल्या वयाला दूर सारत मोठ्या पडद्यावर हजेरी लावतात, इतर सगळा वेळ ते आता त्यांच्या फार्महाउस वर घालवतात. सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे ती त्यांच्या पहिल्या पत्नीची अर्थात प्रकाश कौर यांची.

याला कारण ठरले ते अभिनेता सनी देओल यांनी इन्स्टाग्रामवर आई प्रकाश कौर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला हे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रकाश कौर यांची चर्चा सुरु झाली. सध्या लॉकडाउन सुरु असल्यामुळे सनी देओल त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. यामध्येच त्यांनी आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. सनी बऱ्याचेळा त्यांच्या आईसोबतचे फोटो शेअर करत असतात.


दरम्यान, प्रकाश कौर या प्रकाशझोतापासून लांब रहात असल्याचं पाहायला मिळतं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांनी १९५४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी धर्मेंद्र यांचं वय केवळ १९ वर्ष असल्याचं म्हटलं जातं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन मुलं असून ते कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु 'शोले' चित्रपटादरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं सूत जुळलं आणि घरातल्यांचा विरोध पत्करुन या दोघांनी लग्न केलं.


Post a Comment

Previous Post Next Post