साल होत, १९७८ नारायण मूर्ती तेव्हा पटनी कॉम्पुटर या कंपनीमध्ये जॉबला होते व ऑनसाईट परीसाला गेले होते. त्या काळात साम्यवाद अन डाव्या विचारसरणीविषयी आकर्षण नाही असा माणूस विरळाच !! (१९९० मध्ये USSR चा बुडबुडा फुटला अन हे आकर्षणही संपले, असाच चीनच्या साम्यवादाचा बुडबुडा कधी फुटेल याची आम्ही वाट पाहून आहोत.) तर नारायण मुर्तीही याला अपवाद नवते तेव्हा परत येताना या साम्यवादी देशांना भेटी देत येण्याचा मार्ग त्यांनी निवडला. ते पॅरीसमधुन निघाले, अन एकेक देश करत बल्गेरिया नावाच्या एका युरोपीय देशात पोचले. कुणीतरी म्हटले आहे कि एखादा देश कसा आहे? किती प्रगत आहे? इथेले लोक कसे आहेत? हे जर पाहायचे असेल तर त्या देशाच्या रेल्वेच्या जनरल वार्डने प्रवास करा.

भारताला प्रगत म्हणणाऱ्यानी एकदा जरूर करा, अन ज्यांना भारतात असहिष्णुता वाढलीय अशा दोहोंनी भारतीय रेल्वेने प्रवास करा म्हणजे कळेल कि भारत किती प्रगत आहे. अन खरच भारतात असहिष्णुता आहे का?

तर आपले नारायण मूर्ती हे बल्गेरियाच्या ट्रेनने प्रवासाला लागले, त्यांच्या शेजारच्या बाकावर एक स्री बसलेली होती. मूर्ती त्या महिलेशी गप्पा मारू लागले, पण आता ट्रेनमध्ये गप्पा मारणे हे जन्मजातच सोशल डीस्टन्सींग पाळणाऱ्या त्या महिलेला कसे माहिती असणार. तिला बिचारीला वाटले, की हा माणूस बहुतेक गुप्तहेर आहे अन आपल्या देशाविषयी माहिती जमा करतोय. तिने हळूच पोलिसांना हा माणुस संशयास्पद असल्याची तक्रार केली. नारायण मुर्तींना त्या अज्ञात प्रदेशात अटक झाली, त्याचं सामान सगळ जप्त झाले अन कुणीही त्यांचं ऐकुन घेतलं गेलं नाही. त्यांना एका आठ बाय आठ च्या खोलीत डांबुन तब्बल बहात्तर तास ठेवलं गेलं.

हा प्रसंग नवीनच असल्याने नारायण मुर्ती प्रचंड घाबरले होते, कोणीही त्यांचं ऐकुन घेत नव्हतं. आता जगु की वाचु, इथुन बाहेर कसे पडु, काहीच समजत नव्हते. त्यांचे कपडे, सामान, पैसे दिलेच नाहीत, वर सुनावले. भारत बल्गेरीयाचा मित्र आहे म्हणुन तुम्हाला जिवंत सोडत आहोत. नारायण मुर्ती त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, ते बाहत्तर तास आठवले की आजही अंगाचा थरकाप होतो. यानंतर मूर्ती काहीकाळ डिप्रेशन मध्ये गेले होते.

त्यांनी मनोमन ठरवले, “मी एक अशी कंपनी उभी करीन, प्रचंड मोठी अन अशी कंपनी त्या कंपनीत माझ्या देशातल्या लाखो, करोडो लोकांना रोजगार मिळेल. सॉफ्टवेअर क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी कंपनी उभा करीन, त्यासाठी माझं सर्वस्व देईन. आयुष्यामधली एक मोठी रिस्क घेऊन त्यांनी पटनी कॉम्पुटरमधली नोकरी सोडली. सोबत काहीही फार पैसे नसताना नवा डाव मांडला.

१९८१ मध्ये त्यांनी सुरु केलेली कंपनीची सुरवात हळूहळू चालायला लागली, पहिल्या दहा वर्षात काही खास झाल नाही. १९९० मध्ये कंपनीतल्या सात पार्टनर्सनी इन्फोसीसला विकून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवला. या प्रसंगाने मुर्ती प्रचंड अवस्थ झाले होते, त्यांना अस वाटत होते जणु कुणी त्यांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या मुलाचा गळा घोटतोय. या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला अन हाणून पाडला, त्यांनी भागीदारांना सांगितले फक्त थोडे दिवस थांबा, मला काळोखामध्ये आशेचा किरण दिसत आहे. अन त्यापुढच्या दहा वर्षात इन्फोसीसने इतिहास घडवला. जो इन्फोसीसचा शेअर ९२ रुपयांना होता पुढच्या आठ वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने विकला गेला,  म्हणजे १४६ पटींने वाढला. हा विक्रम अजूनही कुणी मोडला नाही. २००० साली फक्त २००० करोड रुपये निव्वळ नफा होता, तो २०१० मध्ये तो चौदा हजार करोड रुपये होता. जवळपास २ लाखापेक्षा जास्त लोक या कंपनीमध्ये काम करतात.


Post a Comment

Previous Post Next Post