लॉकडाऊनच्या काळात अनेक नट नट्या आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. राहिलेलं काही उपक्रम, छंद जोपासण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून होतोय अन तसा सल्लाही ते देताना दिसत आहेत. असाच एक छंद अभिनेत्री भूमी पेडणेकर जोपासतेय. हटके भूमिकांसाठी प्रसिद्ध भूमी लॉकडाऊनच्या या वेळी असाच एक हटके प्रयोग करताना पहायला मिळतेय. ति चक्क जलसंवर्धन शेतीचं तंत्रज्ञान (हायड्रोपोनिक) अवगत करण्याचा प्रयत्न करत आहे. अन तिची आई, सुमित्रा पेडणेकर भूमीला या तंत्रज्ञानाचे धडे देत आहे. भूमी अन तिच्या आईला गेल्या काही दिवसांपासून घरातच भाजीपाल्याची एक बाग बनवायची इच्छा होती. पण शहरात जागा कमी, त्यामुळे त्यांना हे काही करता येत नव्हते.

लॉकडाऊनच्या या काळाने अनेकांना स्वतःचे काहीतरी राहिलेले शोधायचा वेळ दिला अन असाच विचार करायला फावला वेळ दोघींना मिळाला अन त्यन्नी या वेळेचा उपयोग करत जलसंवर्धन शेती तंत्रज्ञान शिकण्याची आयती संधी साधून घेतली अन या तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला लावण्यास सुरूवात केली. या भाज्यांची वाढ झाल्यावर आवश्यक त्या जवळपास सगळ्या भाज्या त्यांना अगदी घरातच मिळणार आहे. हे आगळवेगळं यश मिळाल्याचा आनंद आपल्याला असल्याच्या भावना भूमीने इन्सटाग्रामवर व्यक्त केल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ची सर्व नियमावली पाळून आपण जमेल तितक जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात या जलसंवर्धन शेतीच्या माध्यमातून राहू शकतो आहे याचा खूप आनंद होत असल्याचे ही भूमी सांगते.

हायड्रोपोनिक या तंत्रामध्ये मातीशिवाय पाण्यामध्ये पिकाच्या वाढीसाठी लागणारे सगळे अन्नघटक पाण्यात विरघळवून झाडांना पुरवले जातात. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान याचा मुख्य फायदा म्हणजे पिकासाठी वापरलेल्या जाणाऱ्या पाण्याची खूप बचत होते. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे मुख्यत्वे गाजर, लेट्युस, मुळा, टोमॅटो यासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. आपणही या तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी सहजपणे नैसर्गिक भाजीपाला पिकवू शकतो.


Post a Comment

Previous Post Next Post