इरफान पठाण कुणाला माहिती नाही? कपिल देव यांचा वारसा चालवणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून इरफानचे नाव आजही सन्मानाने घेतले जाते. इरफानने सुरवात जरी एक गोलंदाज म्हणून केली असली तरी त्याने लवकरच एक फलंदाज म्हणूनही नावलौकिक कमावला. काही सामने तर असे होते कि त्याने प्रमुख फलंदाजाची भूमिका पर पडली. पण आजचा लेख त्याच्या अतिसुंदर अशा पत्नीच्या बाबतीत आहे.

इरफान पठाणने २००३ मध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात पदार्पण केले. ज्यावेळी तो आपला पहिला सामना खेळला तेव्हा तो अवघा 19 वर्षाचा होता. ऑस्ट्रेलियामधील एडिलेड इथली ती कसोटी होती, अन हि कसोटी भारताने आपल्या खिशात टाकली. याच मालिकेदरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यातही पदार्पण केले. आदल्या वर्षी म्हणजे २००१-२००२ या वर्षी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अत्यंत उल्लेखनिय कामगिरी केली होती, अन याच कामगिरीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. पण इरफान खऱ्या बहरात होता तो २००६ मध्ये, चेपेल गुरुजींच्या शाळेत त्याने फलंदाजीवर लक्ष द्यायला सुरवात केली, पण त्याआधी पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच ओवरमध्ये त्याने हेट्रीक घेतली. अशाच अनेक चांगल्या खेळ्यानंतर २०१२ साली तो आपला शेवटचा सामना खेळला.

तर असा हा हरहुन्नरी खेळाडू २०१६ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकला. इरफान खानची बायको सफा बेग हि एक एक सुपरमोडेल होती. दोन वर्षांपूर्वी सफा अन इरफानची भेट झाली दोघे प्रेमात पडले. हैदराबाद येथे २८ फेब्रुवारी १९९४ येथे जन्मलेली सफा, लहानाची मोठी सौदी अरेबियामध्ये झाली. तिचे संपूर्ण कुटुंब तिथेच राहते. सफा अखाती देशात सुपरमॉडेल म्हणून काम करत होती, एका फैशन मेगजीनवरही ती दिसली होती. या वर्षी दोघे विवाहबंधनात अडकले.

Post a Comment

Previous Post Next Post