मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हा कदाचित मुंबईच्या इतिहासातील एक मैलाचा दगड असेल. काही वर्षांपूर्वी यावर एक चित्रपट आला होता, लालबाग परळ !! हिंदीमध्ये हा चित्रपट सिटी ऑफ गोल्ड या नावाने प्रदर्शित झाला होता. लालबाग परळ या चित्रपटामध्ये एक वेगळी अशी प्रेमकहाणी दाखवली होती, म्हाताऱ्या मामांसोबत लग्न झालेली मामी आपल्या शेजारच्या एका मुलाच्या प्रेमात पडलेली दाखवलेली आहे. परिस्थिती अन समाज यांच व्यवस्थीत भान असलेली मामी आपल्या भडक भूमिकेमुळे अन चित्रपटातील भडक दृश्यांमुळे सर्वांच्याच लक्षात राहिली.

अनेक लोकांना माहिती असेल लालबाग परळमधील मामी ही अत्यंत लोकप्रिय अशी हिंदी-मराठी-गुजराती अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी हिंदी चित्रपटात काम केलेलं आहे. या अभिनेत्रीचे नाव काश्मीर शाह अस आहे. तिचा जन्म २ डिसेंबर १९७१ मध्ये मुंबईमधल्या एका मराठी-गुजराती कुटुंबात झाला. लोकप्रिय शास्त्रीय गायिका अंजनीबाई लोलकेर यांची काश्मीर आईकडून नात लागते. काश्मीरचे सगळे शिक्षण मुंबईतून पूर्ण झाले अन शिक्षण पूर्ण केल्यावर तिने १९९४ मध्ये हिंदी टेलिव्हिजनमधून आपल नशीब आजमावायला सुरवात केली. हळूहळू तिचा अभिनय क्षेत्रात जम बसला अन तीने १९९६ पासून चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. एक डान्सर, मोडेल म्हणूनसुद्धा इंडस्ट्री तिला ओळखते ज्यावेळी ती मोडेलिंग करायची तेव्हा ती मिस युनिव्हर्सिटी वर्ल्डआणि मिस इंडिया टॅलेंटसारखे पुरस्कार ती जिंकली आहे. पण या अभिनेत्रीचा पती हा तिच्यापेक्षाही मोठा अभिनेता आहे. कॉमेडीच्या दुनियेतल्या सर्वोत्तम काही कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. चीची अर्थात गोविंदा यांचा भाचा अन कोमेडीचा सुपरस्टार कृष्णा हा काश्मीरचा पती आहे.

काश्मीरने मराठी आणि हिंदी अशा खूपशा चित्रपटांत काम केले आहे. बिग बॉस च्या पहिल्या सिझनमध्ये सुद्धा तिने भाग घेतला होता त्याचबरोबर २००७ मध्ये नच बलियेतर २०११ मध्ये खतरों के खिलाडीमध्ये सुद्धा तिला घेण्यात आले होते. काश्मीर प्रमुख नायिकेपेक्षा छोट्या पण महत्वाच्या अशा अनेक भूमिकांमध्ये आपल्याला दिसली यामध्ये उल्लेखनीय अशा भूमिका म्हणजे यस बॉसचित्रपटात सिमा चौधरीचे साकारलेले कॅरॅक्टर, ‘प्यार तो होना ही था’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘हेरा फेरी’, ‘कही प्यार ना हो जाए’, ‘लालबाग परळ’, ‘रेवती’, ‘जंगल’, ‘शिकारीमधल्या भूमिका होत. डान्सर म्हणून कुरुक्षेत्र’ ‘बंथन’, ‘मर्डरचित्रपटात दिल को हज़ार बार रोकाया चित्रपटातील अनेक लोकप्रिय आयटम सॉंग खूप गाजले. कश्मिराच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास कॅलिफोर्नियाच्या चित्रपट दिग्दर्शक ब्रॅड लिस्टरमॅनअन काश्मीर अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते अन या प्रेमाचं २००२ मध्ये लग्नात रुपांतर सुद्धा झाल. पण मतभेदांमुळे अवघ्या पाच वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर २००७ ला ते वेगळे झाले. त्यानंतर कृष्णा अभिषेक अन काश्मीर एकमेकांच्या जवळ आले, या जवळीकीचे रुपांतर प्रेमात झाले अन शेवटी 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. कृष्णा अन काश्मीर यांना २ मुळे आहेत.Post a Comment

Previous Post Next Post