तेजस्विनी पंडित हे मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या रूपाने अन अभिनयाने भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. आपल्या बोल्डनेसमुळे अन अभिनयाने अनेको हृदयांवर तेजस्वीनी करत आहे. पण अभिनय करणे अन प्रसिद्ध होणे हे इतके सोप्पे असते का? निदान तेजस्विनीसाठी मात्र हे तितके सोप्पे नवते... कारण आईच्या पुण्याईच्या जोरावर पदार्पण करण्यापेक्षा स्वतःचा कर्तृत्वावर यशाला गवसणी घालणे हे तिने निवडले.
तेजस्वीनीची आई ज्योती चांदेकर या रंगभूमीवरच्या जेष्ठ अभिनेत्री पण तेजास्वीने आईचा वशिला काही वापरला नाही. एका कार्यक्रमात तिने सांगितले कि, एकवेळ तर अशी होती कि तेजस्विनी अडीच महिने अंधारात राहिलो. झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ नावाच्या कार्यक्रमात तेजस्विनीनं आयुष्यातल्या अनेक आठवणी जागवल्या होत्या. तिने सांगितले कि “आई एकटी कमावती होती, अन घर चालवण्यासाठी ती एकदा चार-चार नाटकांत काम करायची. पण आईंचे सहकलाकार प्रशांत सुभेदार यांचे निधन झाले अन ती चारही नाटके बंद पडली. त्या वेळी घरात फक्त १ रुपया, थोडासा मैदा अन साखर शिल्लक होती. आईने मैद्याची बिस्किटे बनवली अन ती खाऊन आम्ही तो दिवस पुढे ढकलला. इथे जेवणाचे हाल होते तर वीजेचं बिल भरणे हि शौकाची गोष्ट ! अडीच महिने आम्ही अंधारात राहिलो. त्यानंतर लावणीच्या प्रयोगांच्या पैशे मिळाले अन मग आम्ही बिल भरले."
तेजस्विनीने अंकुश चौधरीसोबत पहिली जाहीतर केली तर चित्रपटात तिचे ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातील खलनाइकी भूमिकेने झाले. संघर्ष हा यशाचा पाया आहे, तुम्ही संघर्षामध्ये जितके जास्त हातपाय हलवाल तिथे जास्त मोठे यश तुमचे असेल.
Post a Comment