आज बारा-एकच्या सुमारास घराकडे निघालो, ऑफिसपासून घर साधारणपणे १५ किलोमीटर असेल पण या ३० मिनिटाच्या प्रवासात घशाला भयानक कोरड पडली, अन घरात घुसल्या घुसल्या पहिले पाणी प्यायलो. जर १५ किलोमीटर फिरताना पाणी नाही मिळाले तर माझी हि अवस्था तर सबंध देशात एकही नदी नसणाऱ्या देशांची काय अवस्था असेल, सोबतच वाळवंट अवस्था अजून दयनीय करत असेल. आज आपण पाहूयात सौदी अरेबिया अन तिथल्या पाण्याविषयी.

तेलासाठी प्रसिद्ध सौदी अरेबिया या देशात पाण्याची नदी जवळपास नाहीच(माक्केतल्या झमझम वगैरेंचा अपवाद) अन इतक्या तापमानामुळे भूपृष्ठाखालील पाण्याची पातळी सुद्धा फारच कमी, अशा परिस्थितीमध्ये पिण्याचे पाणी हे अरब लोक कुठून आणत असावेत? उत्तर आहे अँक्विफायर.

आता हे अँक्विफायर म्हणजे काय? तर अँक्विफायर ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये भूपृष्ठाखालील पाण्याचे संधारण केले जाते, पाण्याला धरून ठेवणारे काही दगड (म्हणजे ज्यातून पाणी झिरपत नाहीत असे, आपल्या बाथरूमच्या फरशा असतातना त्या गुणधर्माचे) जमिनीच्या खालीही असतात या दगडांचा वापर या पद्धतीत केला जातो. सौदी अरेबियामध्ये 1971 सालापासून या पद्धतीचा वापर करणे सुरू झाले. सौदी अरेबियामध्ये सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात अँक्विफायर साठी सबसिडी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये अँक्विफायर चे प्रमाण वाढले आणि याचा उपयोग नागरी आणि कृषी या हेतूंसाठी केला जातो. अगोदर कमी असलेले जमिनीखालचे पाणी पुरते का यांना? तर उत्तर आहे नाही.

जमिनीखालचे पाणी हा एक पर्याय आहे, पण हा एकुलता एक पर्याय नक्कीच नाही. सौदी अजून एक पर्याय वापरते तो म्हणजे समुद्राचे पाणी ! डिसिलेशन प्रक्रियेद्वारे समुद्राच्या पाण्यातील पिण्यासाठी हानिकारक असलेल्या व अन्य तत्सम घटकांना दूर केले जाते व हे पाणी पिण्यालायक बनवले जाते. सीलाईन वाँटर काँन्झर्वेशन सेंटर मधून वॉटर स्टेशनला डेसिलिनेशन प्रक्रिया कार्यान्वित केली जाते व याद्वारे रोज जवळपास 3 मिल्लियन लिटर इतके पिण्याचे पाणी तयार होते. डिसिलेशन प्लांट मध्ये निर्माण होणाऱ्या पाण्याचा उपयोग हा मुख्यत्वे शहरी पाण्याची गरज भागवण्यासाठी होतो. तसेच या प्लांट मधून निर्माण होणारे पाणी हे उद्योगांच्या वापरासाठी सुद्धा वापरले जाते.

आता पाण्याचा अशा प्रकारे निर्माण व उपयोग करणारा सौदी एकटा देश आहे का? तर नाही युनायटेड अरब अमिरात, कतार, कुवेत हे देशसुद्धा असाच पाण्याचा वापर करतात.इथली सरकारे शहरी भागातील पाण्याचा जवळपास 40 टक्के इतका भाग पुनर्वापर करतात. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी रियाद ,जेहाद इत्यादी ठिकाणांच्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये निरनिराळे उपक्रम हाती घेतले जातात व पाण्याच्या पुनर्वापरासाठीचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उभारले गेले आहेत. पाण्याच्या पुनर्वापराअंतर्गत शहरी भागातील उद्याना मधील झाडांसाठी व सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो.

Post a Comment

Previous Post Next Post