shrirama currancy

चलनी नोटा अन त्यावर असलेले फोटो हा बऱ्याचदा चर्चेचा विषय होतो. कधीकधी काही व्हाटसअप पोस्ट अन फेसबुक पोस्टमधून दुसऱ्या एखाद्या राष्ट्रपुरुषालाही चलनावर स्थान मिळावी अशी मागणी होत असते. पण चलनावरील चित्र हे बदलता येत नाही, अन भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याकारणाने कोणत्याही धर्माच्या देवदेवतांना नोटांवर ठेवले गेलेलं नाही. पण तुम्हाला माहितीये का कि अशा काही नोटा आहेत जिथे नोटांवर प्रभू रामाची प्रतिमा आणि रामनाम आहे?


नेदरलैंड (हॉलंड) मध्ये एक संस्था आहे, नाव आहे 'द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस' या संस्थेने २००२ पासून आपल्या नोटांवर प्रभू श्रीरामाच्या नोटा वापरायला सुरवात केली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या संस्थेचे लाखोंमध्ये अनुयायी आहेत अन हि सगळी भक्त मंडळी या नोटांचा वापर करतात. मेडीटेशन, अध्यात्म, योग इत्यादी विषयक प्रसार अन शांती चा जगभरात प्रसार या गोष्टी हि संस्था करते. १, ५ आणि १० अशा किंमतीमध्ये हे चलन आहेत. रामराज्य असे लिहलेल्या नोटेवर प्रभू श्रीरामाची प्रतिमा आहे सोबत कामधेनु व कल्पवृक्ष आहेत.

नेदरलैंड ज्या देशात प्रामुख्याने हि संस्था काम करते तिथे जवळपास ३० गावांमध्ये या नोटांचा अधिकृत चलनाप्रमाणे वापर होतो. येथील सरकारने देखील या चलनाला आक्षेप घेतलेला नाही अन एका राममुद्रेच्या बदल्यात १० युरो, जवळपास ९०० रुपये असा दर ठरलेला आहे. बँकेमध्येसुद्धा या नोटा आपल्याला टाकता येतात. कसा वाटला लेख नक्की कळवा, अन पुढे पाठवा हि माहिती.

Post a Comment

Previous Post Next Post