सध्या महाराष्ट्रात तीन पुस्तकांनी धुकामुल घातला आहे, मुख्यमत्री बनवण्याच्या घडामोडीवर आधारित या पुस्तकांनी अनेक गोष्टी पडद्यामागून पडद्यासमोर आणल्या आहेत. असेच एक पुस्तक आहे सुधीर सोमवंशी यांचे चेकमेट(सध्या हेच वाचतोय). या पुस्तकाच्या निमित्ताने राज ठाकरे ED प्रकरण पुन्हा वाचण्यात आले अन एक सांगावीशी अशी गोष्ट सांगण्याचा या लेखाच्या निमित्ताने उहापोह

महाराष्ट्राच्या राजकरणात सत्तेवर आसूड ओढणारे नाव म्हटले कि समोर येते ते राज ठाकरे यांचे नाव. २००६ साली शिवसेना सोडून राज यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली. अन सगळे काही व्यवस्थीतही सुरु झाले, २००९ च्या निवडणुकीत पक्षाचे तब्बल १३ जागांवर विजय मिळवला. राज ठाकरे हे नाव प्रत्येक मराठी मनात कोरले गेले, पण तुम्हाला माहिती आहे का, राज ठाकरे यांचे नाव मुळात राज ठाकरे हे नाहीच आहे !!

धक्का बसला ?? इडी प्रकारांच्या वेळी हि बाब अर्थात माझ्या लक्षात आली, कारण जेव्हा त्यांना नोटीस पाठवली होती त्यावर राज ठाकरे अस नाव मुळात नवतेच. त्या नोटिशीवर लिहिलेलं होत स्वरराज एस. ठाकरे !! अर्थात स्वरराज श्रीकांत ठाकरे अस !! श्रीनात ठाकरे हे महाराष्ट्रातले मोठे नाव, बाळासाहेबांच्या व्यंगचित्राइतकेच त्यांचे समीक्षा लेख महाराष्ट्रात गाजयाचे. संगीताशी त्यांचा विशेष लगाव म्हणूनच आपल्या मुलांची नाव ही संगीतावरून ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला

बायकोचे नाव त्यांनी मधुवंती रागनुसार मधुवंती ठेवले. तर मुलाचे नाव ‘स्वरराज’ म्हणजे स्वराचा राजा आणि मुलीचे नाव ‘जयजयवंती’ हा अजून एक संगीतातील राग अशी ठेवली. लहानपणापासून; राज ठाकरेंना तबला, व्हायोलिन, गिटार इ. लळा लागला होता. पण त्यांचे प्रेम होते ते व्यंगचित्रांवर, आजही त्यांची व्यंगचित्रे मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत, अन सत्तेवर आसूड ओढणे यात तर त्यांची मक्तेदारी.;

Post a Comment

Previous Post Next Post