Bhau Kadam Daughter

नाटकामधून काम करत चित्रपटात येणारे कलाकार आपल्या दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध असतात. अगदी सर्वसामान्य माणसाचे हुभेहुभ प्रतिनिधित्व करणारा अन आपल्या निरागस अभिनयाने खुदकन हसायला भाग पाडणारा अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम. अख्ख्या महाराष्ट्राला भाऊच्या कॉमेडीने अक्षरशः वेड लावले आहे. मुंबई मध्ये वडाळ्यात भाऊचा जन्म झाला. वडील एका पेट्रोल पंपावर काम करायचे, पण वडिलांचे अकाली निधन झाले अन सगळा भार भाऊच्या अंगावर पडला. भाउनीशाळेत असताना काही नाटकात त्यांनी काम केले होते. पण अभिनयातून पैसे मिळवणे हि त्याच्यासाठी खूप दूरची गोष्ट होती.

भाऊने खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केले, पान सुपारी विकण्याचे कामदेखील त्याने केले. पण सोबतच आपली अभिनयाची आवडही जोपासली. अन अशात एक दिवस प्रसिद्ध अभिनेते विजय कदम चक्क त्याच्या घरी आले. त्यांनी त्याला नाटकात काम करायला सांगितले अन भाऊ तयारही झाला. मग त्याला 'फू बाई फू' ही मालिका मिळाली. हि मालिका प्रचंड गाजली, अनेकांचे भविष्य या मालिकेने घडवले. भाऊ तर या मालीकेच एक आकर्षण होता, अशात 'चला हवा येऊ द्या' सुरु झाली अन प्रेक्षकांच्या ओळखीचा झालेला भाऊ त्यांच्या ओठावरचे हास्य बनला. लोक दिवसभराचा शिन या मालिकेमुळे आजही घालवतात.

Mrunmayi Bhalchandra Kadam

भाऊने मध्यंतरी एक फोटो शेयर केला यात भाऊ त्याची पत्नी अन मुलगी यांच्याबरोबर दिसत आहे. त्याच्या मुलीचे नाव मृण्मयी. मृण्मयीने अनेक फोटो शेयर केलेले आहेत. वडिलांचे अभिनयाचे गुण तिच्यात आहेत कि नाही माहिती नाही, पण एक अभिनेत्री बनण्याच्या योग्य असा तिचा चेहरा नक्कीच आहे. व्हिडिओमध्ये ती समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे. तसेच तिने काही फोटो शूट देखील केले आहेत. तिच्याबाबत सध्यातरी अधिक माहिती उपलब्ध नाही, पण एखाद्या चित्रपटात ती पुढच्या काळात दिसली तर नवल वाटावयास नको

Post a Comment

Previous Post Next Post