बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार आपल्या नावात बदल करतात. काही जन आडनाव लावत नाहीत, काहीजन स्पेलिंग बदलतात. पण जेव्हा त्यांची खरी नावे चाहत्यांना कळतात तेव्हा चाहत्यांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आपल्या आगळ्या वेगळ्या नावामुळे कदाचित आपले जगापुढे हसे तर होणार नाही ना, कदाचित हि भीती त्यामागे असू शकेल.

तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात यायच्या आधी आधी श्रीवास्तव हे आडनाव बदललं होत तर सैफ अली खानचे नाव साजिद अली खान असे आहे. पण तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल कि आपल्या हटके लुकमुळे प्रसिद्ध असणारी चिकणी चमेली, कतरीनाचे नाव अगदी म्हणजे अगदीच वेगळे आहे.

अनेकांना माहिती असेल कि कॅटरीना कैफ ब्रिटनची नागरिक अन लहानपणापासून तिचे कुटूंब व्यवसायासाठी बरेच देश फिरून मग लंडनमध्ये स्थाईक झाले. ती सुरूवातीच्या काळात फॅशन क्षेत्रात ती नशीब अजमावत होती, अन अशात मेने प्यार किया चित्रपटाच्या निमित्ताने तिने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली. लाखो दिलांवर राज्य करणाऱ्या कॅटरिनाच खर नाव काय आहे माहितीये ?? तिचे खरे नाव कॅट टरकोटे अस आहे. पण भारतीयांना हे नाव थोड वेगळे वाटेल अन तिला ते लवकर विसरतील या भावनेने तिने कैफ ये आडनाव लावायला सुरवात केली. टरकोटे हे आडनाव तीच्या आईचे होते. ती आपल्या आईचे नाव लावत असे पण त्यानंतर मात्र तिने आपल्या वडिलांचे कैफ हे नाव लावायला सुरवात केली. कॅटच्या वडिलांचं नाव मोहम्मद कैफ अस होत यामुळे कॅटने आपल्या नावासमोर वडिलांचं आडनाव लावण्यास सुरूवात केली. तिने आपले नाव बदलण्याचा किस्सा आधीच सांगितलेला आहे अन तिचा पासपोर्टवरही टरकोटे हेच आडनाव लिहिलेले होते, पण आता मात्र तिने ते बदलून कैफ असे केले आहे.

न्युयार्क, राजनिती, धुम 3, एक था टायगर, मेरे ब्रदर की दुल्हन, जिंदगी ना मिलेगी दोबारा असे कित्तेक चित्रपट तिने केले. तिला सहायक अभिनेत्री म्हणून फिल्मफेयरसुद्धा मिळाला. यावर्षी ती सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार होती पण लॉकडाऊन मुले चित्रपट थोडा लांबणीवर पडला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post