कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन आहे(गोव्यात नाही बर का..!!) अन याकाळात अनेक लोकांना आपला लुक चेंज करण्याची भारीच लहर आलेली आहे. अनेक लोकांनी दाढी वाढवण्याची आपली जुनी इच्छा याकाळात पूर्ण करून घेतली आहे, अन काहीजणांची आपोआप झाली आहे. आज शाउट मी मराठी तुम्हाला अशाच दाढीची अन दाढीवाल्याची गोष्ट सांगणार आहे.

आटपाट नगर होत !! ब्राउनाउ एम इन नावाचं एक लहानस गाव, इतिहासात ऑस्ट्रियाचं हे गाव हिटलरचं जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. पण आपण हिटलरच्या जन्माच्या आधी जाणार आहोत. या गावात हिटलरचा जन्म होण्याच्या आधी एक विचित्र घटना घडली, या ब्राउनाउ अॅम इन चे महापौर होते हान्स स्टेनिंजर नावाचे गृहस्थ. या हान्स महाशयांना दाढी वाढवण्याची भारीच हौस अन त्यांनी ती इतकी वाढवली कि पंचक्रोशीत त्यांच्यैतकी दाढी कुणालाच नवती. इतिहासात तर या युरोपीय लोकांनी त्यांचा उल्लेख सगळ्यात लांब दाढी असणारा गृहस्थ म्हणून नोंदवून ठेवला आहे. पण त्यांचे हे लांब केसच त्यांचा गळा कापणार होते म्हणा, म्हणजे या केसांमुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला.

साल होते, १५६७ आपले हान्स(भाऊ) एक नेता म्हणून प्रसिद्ध होते, त्यात त्यांची साडेचार फुटी दाढी ती त्यांना अजूनच प्रसिद्धी मिळवून देत होती(त्याचं निवडणूक चिन्हच होते म्हणा कि ते). वर्षानुवर्षे त्यांनी ती सांभाळली होती, आणि तिच्यासाठी खिसेसुद्धा तयार करून ठेवले होते. या खिशांमध्ये तो दाढी गुंडाळून ठेवायचा. दिवस होता २८ संप्टेंबर १५६७ चा कशी कुणास ठाऊक पण ब्राउनाउ अम इन या गावाला आग लागली. धावाधाव-पळापळ सुरु झाली, या पळापळीत त्यांची दाढी त्यांच्याच पायाखाली आली अन पायऱ्यांच्या टोकावरून ते खाली पडले अन त्यांची मान मोडली. ज्या दाढीमुळे ते पंचक्रोशीत ओळखले जात, जिला त्यांनी जीवापाड जपले होते तीच दाढी त्यांच्या जीवावर उठली अन त्यांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरली.

हान्स स्टेनिंजर यांच्या मृत्युनंतर गावकऱ्यांनी त्यांची एक एक भलीमोठी मूर्ती बनवली हि मूर्ती आजही या गावात आहे. त्यांना पुरण्यापूर्वी त्यांची दाढी कापून घेतली गेली अन आजही हि दाढी गावातल्या संग्रहालयात जपून ठेवलेली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post