महाराष्ट्रातल्या लाखो महिलांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या अलका कुबल यांना कोण ओळखत नाही. घराघरात त्यांच्यात स्वतःला पाहणाऱ्या अनेक स्रिया आहेत. माहेरची साडी या त्यांच्या चित्रपटाने तर इतिहास घडवला, आजही या चित्रपटाला टीवी वर खूप जास्त TRP मिळतो. पण अलका कुबल यांच्या आयुष्याबद्दल अन त्यांच्या जोडीदाराबद्दल बहुतांश लोकांना माहिती नाही.

अलका कुबल याचं लग्न झालेले आहे ते समीर आठल्ये यांच्यासोबत. स्मित हे फिल्म इंडस्ट्रीतील एक सिनेमेटोग्राफर म्हणून मोठे नाव आहे. अलका कुबल अन समीर यांनी प्रेमविवाह केला. अलका कुबल व समीर यांनी एकत्र अनेक चित्रपट केले अन या दरम्यानच ते एकमेकांना आवडायला लागले, अन हे आवडणे कधी प्रेमात बदलले दोघांनाही कळले नाही. पण समीर लग्नासाठी पुढाकार घेईनात तेव्हा अलका कुबल यांनीच विचारले, किती वर्ष असच राहायचं आता लग्न करूयात अस त्यांनी सांगितले तेव्हा गोष्ट पुढे गेली. अलका कुबल यांना घरातून विरोध झाला पण तो नावापुरताच, याव्यतिरिक्त तरी लग्नात काहीही विघ्न आले नाही.

अलका कुबल यांनी अनेक व्यावसाईक नाटकामधून बालकलाकार म्हणून काम केले होते, जेव्हा त्या दहावीमध्ये होत्या तेव्हा त्यांनी 'वक्र' नावाच्या चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली त्यानंतरनटसम्राट, संध्याछाया, वेडा वृंदावन अशा काही नाटकांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. प्रमुख भूमिका म्हणजे स्त्रीधन’ या चित्रपटामध्ये त्यांनी केलेली व्यक्तिरेखा. पण ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचे यश अभूतपूर्व !! प्रसिद्ध चित्रपटाच्या लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना, माहेरचा आहेर, दुर्गा आली घरा, काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्त्वपरीक्षा, अग्निपरीक्षा असे त्यांचे अनेक चित्रपट तुफान लोकप्रिय झाले. नंतर काही चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली. अमृतवेल, युगंधरा, बंदिनी, येरे येरे पैसा, आकाशझेप अश्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने