गेला आठवडा गाजला तो उत्तर कोरियाचे हुकुमशाह यांच्या बातम्यांनी. च्यायला !! मुख्य मिडिया तर या माणसाच्या मागेच लागलेली असते. करोडो प्रेक्षक असणारे आपले चेनल्स म्हणत होते कि किम जोन उन मेलाय. कारण त्याने म्हणे अमुक अमुक ठिकाणी असलेल तमुक तमुक कार्यक्रला तो उपस्थित नवता. हुकुमशहा किम जोन उन उत्तम स्थितीत आहे.

किमच सगळ आयुष्यच अत्यंत गूढ आहे. अन मिडिया त्याला एका वेगळ्याच रंगात दाखवते. मुख्य मिडिया ज्याप्रकारे त्याला सादर करते त्यात खूप कमी तथ्य आहे. त्याचे आजोबा अन वडील कोरियन लोकांसाठी तळमळ असणारे अन अखंड कोरिया असावा अशी भावना असणारे लोक. अमेरिकेच्या अति साम्यवाद विरोधाचा परिणाम म्हणजे उत्तर कोरिया.

च्यायला !! खूप विषयांतर झाल, आपण आज किम जोंग च्या खासगी आयुष्याबद्दल बोलणार आहोत. त्यांच्या मनाच्या कोवळ्या भागात डोकावणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का एकदा  किम जोंग चक्क एका युवतीच्या प्रेमात पडले होते. म्हणे एकदा किम जोंग ऊन ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी गेला होता. तसा किमला संगीतात जास्त काही रस नवता पण गेला एकदा तो !! वडील देशाचे प्रमुख, अन किम भविष्यातला प्रमुख. ऑर्केस्ट्रा पाहतानाच तो मंत्रमुग्ध झाला, त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. स्टेजवरची युवती त्याच लक्ष वेधून घेत होती, तिची नजर त्याच्या काळजाच्या आरपार जात होती. अगदी पहिल्या नजरेत ती किमला आवडली अन मग किम आणि त्या तरुणीत अनेक भेटी झाल्या.

आपल्या इकडे साधा आमदार असला तर ऑर्केस्ट्रा मधल्या तरुणीच्या प्रेमात पडायच्या अन लग्न करायचे धाडस करणार नाही. अर्थात हे वेगळे किस्से करणार, पण गरीब घरची होतकरू पोर घरात घेणे त्यांच्या सभ्यतेत बसत नाही. अन हे करण्याचे धाडस एखादा माथेफिरूच करू शकतो हो कि नाही ??

 प्रेम !! लग्न ! अन संसार !!.


२०१२ मध्ये कोरियन सरकारने जाहीर केले होते कि आपले प्रमुख किम यांचे आधीच लग्न झालेले आहे. जगातील महासत्तेला कोलणारा, प्रसंगी त्यांची गचांडी धरायची तयारी असणारा अस किम. आता इतका मोठा शत्रू असल्यावर काळजी तर घ्यावी लागणार ना? म्हणून हि गुप्तता. (अमेरिकेने आपला असाच एक शत्रू फिडेल केस्ट्रो याला मारण्याचे शेकड्याने प्रयत्न केले होते) त्यामुळे हे लग्न कधी झाले हे कुणालाच माहिती नाही. रि सोल-जू, म्हणजे तीच ऑर्केस्ट्रामधली मुलगी किमने तिच्याशीच लग्न केले अन त्याच्या वडिलांनाहि त्यात काही आपत्ती नवती.  

उत्तर कोरियाच्या या सर्वात लाडक्या फस्ट लेडीआहेत. एका साधारण अशा कुटूंबातला रि सोलचा जन्म, रि सोल जू जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होणार्या एशियन ऍथलेटिक चॅम्पियनसाठी चियरलिडर्स म्हणून तिची निवड झाली होती. वडील प्राध्यापक तर आई वैद्यकीय पेशामध्ये. जसे खुपसारे उत्तर कोरियन करतात तसेच री ने आपले शिक्षण चीनमध्ये घेतले, अन कोरियात आल्यावर आपल्या उदर निर्वाहासाठी ऑर्केस्ट्रामध्ये काम करू लागली. अन एका कार्यक्रमात किम जोंग ऊन आणि रे ची नजरानजर झाली, अन या विचित्र माणसाने जात-पात-धर्म-हुंडा हे काहीही न पाहता (केव्हडा हा विचित्र !!) तिच्याशी लग्न केले.

रि सोल जूराजकारणातही


उत्तर कोरियाने जेव्हा आण्विक चाचणी केली होती, तेव्हा रि किम सोबत रंगीबेरंगी ड्रेस परिधान करून बरेच फोटो काढताना दिसली. राजकारणातही नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून ती त्याला मदत करते. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आणि रि सोल यांची 2018 साली आंतर कोरियन समेटदरम्यान भेट झाली.

किम जोंग आणि रि सोल यांच्या मुलांचं गूढ

अमेरिकेसारखा मोठा अन कपटी देश अंगावर घ्यायचा म्हणजे जीवाशी खेळ तर आहेच. म्हणून एकप्रकारची गुप्तता पाळण्याची यांच्या घराण्याशी रीत.(आता रोज फेसबुकवर १० जणांना tag करून फोटो टाकायचे नाहीत म्हणजे काय ??) तंत्रज्ञानाच्या अवाक्यामुळे आता खूप जास्त काळजी घ्यावी लागत असेल. सांगितले जाते दोघांना ३ मुले आहेत पण त्यांना कुणीही पाहिलेलं नाही.


Post a Comment

Previous Post Next Post