>आपल्या सुंदर चेहऱ्याने अनेकांच्या दिलांची राणी बनलेल्या लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. अनेकांची मने यामुळे दुखावली असतील, अन अनेकांचा एकतर्फी प्रेमभंग झाला असेल हे मात्र नक्की. गेले काही दिवस सोनाली कुलकर्णीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा माध्यमात सुरु होती, काहींनी तर एका मोठ्या राजकीय नेत्यासोबतही तिचे नाव जोडायचा प्रयत्न केला.

अखेर तिने तिच्या लाईफ पार्टनरविषयी माहिती दिली आहे. दुबईमध्ये राहणा-या कुणाल बेनोडेकर याच्याशी फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला असल्याचे तिने सांगितले अन फोटोही शेयर केले. कुणाल अन माझा साखरपुडा फेब्रुवारी 2020 ला झाला व हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्य अशा आशयाची एक पोस्ट सोनालीने फेसबुकवर लिहिली.

सोनालीच्या लग्नाविषयी अनेक अफवा अनेक वेळा पसरल्या होत्या क्लासमेट्स या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोनालीचं लग्न झालं अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. याबाबत बोलताना सोनाली म्हणाली कि सुरवातीला चित्रपटाच्या सेटवर हा विषय गमतीने घेतला गेला पण त्यानंतर हा विषय खूपच वाढला कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी तिचं लग्न झाल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या. तिने आधी दुर्लक्ष केलं पण जेव्हा तिच्या चुलत बहिणीने तिला फोन करून तिला याबाबत विचारलं तेव्हा सोनालीच्या लक्षात आलं की ही दुर्लक्ष करण्याजोगी साधी अफवा नाही आहे. मग तिने अभिनेता सुशांत शेलारला या माहिती काढण्यास सांगितले. तेव्हा कळले की त्या राजकीय नेत्याची प्रतिमा खराब व्हावी याकरता त्याच्या विरोधकाने ही बातमी पसरवली होती. यावर सोनाली म्हणते की यात माझं नाव का गोवण्यात आले हे मात्र एक कोडं आहे अफवांमुळे एखाद्याला किती मनस्ताप होऊ शकतो याची प्रचिती या घटनेतून येते.

Post a Comment

Previous Post Next Post