मुंबई अन मुंबईची लोकल ट्रेन यांचे समीकरण जर जगभरात प्रसिद्ध आहे. कोरोनामुळे कधी नव्हे ती हि लोकल थांबवावी लागली. पण या लोकलमधून किती लोकांनी प्रवास केलाय अन किती लोकांचे आयुष्य या लोकलमधून बदलले हे केवळ ती लोकलच सांगू शकते. असंच एक उदाहरण आहे ती महाराष्ट्राच्या लाडक्या विनोदवीर भाऊ कदम यांचे.

सध्या लोकसत्ता वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर गप्पांच्या मैफिली जमताना दिसताहेत, अशाच एका मैफिलीमध्ये भाऊ कदम सहभागी झाला होता यावेळी त्याने आपला अन मुंबईच्या लोकलचा किस्सा सांगितला अन अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. भाऊने सांगितले कि फु बाई फु कार्यक्रमाने त्याला पहिल्यांदा घराघरात पोहचवले अन तुफान लोकप्रिय केले. विशेष म्हणजे जेव्हा त्याने कार्यक्रमात काम करणे सुरु केले तेव्हा त्याच्यावर सेलिब्रिटीचा शिक्का बसलेला नवता म्हणून तो लोकलनेच प्रवास करायचा. डोंबिवलीची गर्दी म्हणजे काय, हे कदाचित दुसरा डोंबिवलीकरच सांगू शकेल. 

भाऊ अन कुशल बद्रिके दोघेही डोंबिवलीमधेच राहायचे अन शुटींगवर पोचण्यासाठी ९ वाजून ११ ची गाडी पकडायचे. या प्रसंगाच्या आठवणी भाऊ सांगतो 'सकाळच्या या गाडीला तुफ्फान गर्दी असायची अन आतमध्ये शिरायलादेखील दोघांना जागा मिळायची नाही. अशा परिस्थितीमध्ये मग आम्ही ठाण्याला उतरायचे. सुरवातीला लोक आम्हाला काहीच लोक ओळखायचे पण नंतर मात्र आम्ही प्रसिद्ध होत गेलो अन लोक आम्हाला ट्रेनमध्ये येण्यासाठी आग्रह करू लागले.. आमच्यासोबत फोटो काढू लागले.. एकदा तर एका भजनी मंडळाने माझा अन कुशलचा सत्कारच केला' आजही हे दिवस कधीही विसरू शकत नाही अन हे प्रेम लोकलशिवाय कुठेही मिळणार नाही असे भाऊला वाटते

Post a Comment

Previous Post Next Post