सलमान खान, करोडोंच्या दिलावर राज्य करणारा सुपरस्टार ! सलमानचे कित्तेक अभिनेत्र्यांसोबत जोडले गेले. संगीता बिजलानी असो, सोमी अली किंवा ऐश्वर्या राय. सलमानने खऱ्या आयुष्यात त्याची भूमिका चोख बजावली, भारतभर त्याची चर्चाही झाली. ऐश्वर्यासोबतचे त्याचे नाते तर राष्ट्रीय चर्चेचा विषय होता. अन त्यानंतर त्याची जागा घेतली ती सलमानच्या लग्नाने. पण तुम्हाला माहिती आहे का सलमान खान ने कधीतरी लग्नासाठी चक्क जुही चावलाला मागणी घातली होती.

जुही चावला अन सलमान खान यांचे नाव कधी जोडलेले दिसत नाही पण सलमानला म्हणे जुही चावलाशी लग्न करायचे होते. जुही चावला अन सलमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले अन याकाळी सलमानच्या मनात पालवी फुटली.

सलमान खान याने एका मुलाखतीत सांगितले कि, जुही खूप स्वीट अन प्यारी आहे, मी एकदा तिच्या वडिलांना विचारले होते कि तुम्ही जुहीचे लग्न माझ्याशी लावून द्याल का? पण त्यांनी तो प्रस्ताव नाकारला. बहुतेक त्यांना मी आवडलो नसावो. माहित नाही त्यांना काय हवे होते पण त्यांना जुही अन माझी जोडी बरोबर नाही वाटले. अजून एक गोष्ट सलमान अन जुहीने कोणत्याही चित्रपटात एकमेकांच्या नायक नायिकेची भूमिका केली नाही जेव्हा सलमानला याबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला, जुहीला माझ्यासोबत काम करायचे नवते.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल कि, जुही चावला इचे नाव कधीही कुणा अभिनेत्याबरोबर जोडले गेले नाही. करियर च्या सुरुवातीलाच तिची भेट जय मेहता यांच्याशी झाली. जय हे अगोदरच मेरिड होते पण ते विधुर होते, त्यांच्या पत्नीचे एका विमान अपघातात निधन झालेलं होते. अशातच जुहीच्या आईचेही निधन झाले अन अशा कठीण वेळी जय यांनी जुहीची पाठराखण केली. १९९५ मध्ये तिने जय मेहता यांच्याशी लग्न केले. सलमान खान आजही अविवाहित आहे, अन त्याच्या लग्नाच्या चर्चा आजही चहाटपऱ्यावर केल्या जातात.

 


Post a Comment

Previous Post Next Post