८०-९०च्य दशकातली अभिनेत्री फक्त त्याकाळच्याच नव्हे तर आजही लाखो-करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करते. दिक्षितांच्या माधुरीचा जन्म झाला तो १५ मे १९६७ रोजी, हो आज माधुरीचा वाढदिवस आहे. १९८४ साली अबोध या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी प्रवासाची सुरवात केली. माधुरीचे आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे अनेक अभिनेत्यांना तिच्याशी लग्न करायचे होते. पण माधुरीचे नाव फक्त भारताचा क्रिकेटर अजय जडेजा याच्यासोबत जोडले गेले होते, सांगितले जाते कि या दोघांना लग्नही करायचे होते.

फिल्मी दुनियेत सांगितले जाते कि अजय अन माधुरी यांची प्रेमकथा सुरु झाली ती एका मैगजीन च्या फोटोशूटच्या वेळी. माधुरी त्यावेळी करोडो दिलांची धडकन होती तर अजय लाखो तरुणींचा स्वप्नातला राजकुमार. माधुरीसोबत नाव जोडले गेले तेव्हा अजय बॉलीवूड येणार अशा अफवा आल्या होत्या, सांगतात कि माधुरीने एका प्रोडुसरला अजय जडेजाला एका चित्रपटात घेण्याची विनंती केली होती. पण हा तोच काळ होता तेव्हा एक क्रिकेटर म्हणून त्याचे वाईट दिवस चालू होते. १९९९ मध्ये अजय जडेजा मैच फिक्सिंग मध्ये अजरुद्दिन सोबत दोषी सापडला अन या घटनेने पूर्ण देशाला धक्का दिला. असाच धक्का माधुरी अन जडेजा यांच्या नात्याला बसला अन माधुरी अन जडेजा यांची कहाणी अर्धवटच राहिली, यानंतर माधुरी श्रीराम नेणे यांना भेटली अन त्यांच्याशी तिने लग्नही केले.

 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने