प्रेमाला जात,
धर्म, पैसा, रंग, वय वैगरे काहीही दिसत नाही. दोन जीवांना एकमेकांची ओढ लागली कि
हे सार काही गौण. हे झाले सर्वसामान्यांचे पण छोट्या मोठ्या पडद्यावर असणाऱ्या
लोकांचे काय? हि लोक तर म्हणे लार्जर देन लाइफ आयुष्य जगतात. पण माणसेच ना ती?
त्यांनाही प्रेम होत असेल का? त्यांच्यासाठी वय, धर्म, पैसा, या गोष्टी तितक्या
महत्वाच्या नसतील का ? असे भाबडे प्रश्न आम्हा सामान्य लोकांना यायचेच. आजच्या लेखात
आपण एका महाअभिनेत्याची गोष्ट जाणून घेणार आहोत.
अशोक मामांना कोण ओळखत नाही ?? अशोक सराफ यांचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्यासोबत झाले. तुम्हाला कदाचित माहिती नसेल किंवा ऐकून नवल वाटेल या दोघांमध्ये तब्बल १८ वर्षांचा फरक आहे. अशोकमामा मुळचे बेळगावचे, बेळगाव महाराष्ट्रात कधी येते हे माहिती नाही पण हे बेळगावचे कुटुंब मुंबईला आले अन ४ जून १९४७ रोजी अशोक सराफ यांचा जन्म मुंबईतच झाला. त्यांचे सगळे बालपण मुंबईतच गेले. तर निवेदिता जोशी यांचा जन्म ६ जून १९६५ ला झाला. दोघांची ‘डार्लिंग डार्लिंग’ ह्या नाटकावेळी पहिली भेट झाली त्यावेळी निवेदिता खूप लहान होत्या. १९७१ ला जेव्हा अशोक सराफांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा सिनेमा आला तेव्हा तर अवघ्या सहा वर्षांच्या होत्या. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा या दोघांचा पहिला चित्रपट पण प्रेमाचा धूमधडाका झाला तो ‘धुमधडाका’ चित्रपटाच्या वेळी अन हाच चित्रपट खरे प्रेम होण्यास कारणीभूत ठरला.
Post a Comment