प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे चित्रपटांनी तर 'आग' (त्यांच्या चित्रपटाचे नाव) लावतातच पण आजकाल ते आपल्या विधान्नांनी अन ट्वीटसनी वावटळी उडवायला लागले आहेत. सतत कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे रामगोपाल वर्मा नुकतेच एक फोटोच्या कप्शन मुले चर्चेत आले आहेत. अन नेटकऱ्यानी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोन महिला आहेत त्यातील एक महिला गाडीच्या फ्रंट सीटवर बसली आहे तर दुसरी महिला बॅक सीटवर आहे. पुढच्या महिलेने खुपसा मेकअप आणि दागिने परिधान घातलेली आहेत. याउलट मागची महिला शांतपाने बसली आहे पण तिचा थोडा क्लीवेज दिसत आहे. तर राम गोपाल वर्मांनी हा फोटो उचलला अन तोशेअर करत त्यांनी वादग्रस्त कॅप्शन दिले. यामध्ये ते लिहितात Man made jewellery in front and God made jewellery in the back. माणसाने निर्माण केलेली दागिने पुढे तर देवाने निर्माण केलेले दागिने मागे अस पांचट ट्वीट त्यांनी केले.


राम गोपाल वर्माने शेअर केलेला फोटो आणि कॅप्शन पाहून नेटकरी संतापले आहेत. एका नेटकऱ्याने तर, ‘तुला लाज वाटत नाही का?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने इतक्या घाणेरड्या कमेंट तुझ्यासारखेच लोक करु शकतातअसे म्हणत राम गोपाल वर्माला चांगलेच सुनावले आहे.  काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्माने मद्यविक्रीच्या दुकानांपुढे महिलांनी रांग लावल्यामुळे खोचक ट्विट केले होते. पाहा, मद्य विक्रीच्या दुकानांसमोर लागलेल्या रांगामध्ये कोण उभे आहे. स्वतःच्या जीवाच्या काळजीपोटी मद्यपान करणाऱ्या पुरूषांविरुद्ध बोलणाऱ्या महिला..”, असे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केले होते.


Post a Comment

Previous Post Next Post