तुम्हाला प्रिया
गिल नाव माहिती आहे का? अनेकांनी नकारार्थी मान हलवली असेल पण जेव्हा आम्ही विचारू
कि तुम्हाला सिर्फ तुम या चित्रपटामधली अभिनेत्री आठवते का ? तेव्हा मात्र
तुम्हाला ओळख पटली असेल. आज आपण बोलणार आहोत मिस इंडिया स्पर्धेची रनर अप आणि
बॉलीवूडच्या किंग खान, अन सलमान भाई सोबत काम करणाऱ्या नटीबद्दल.
प्रिया प्रिया गिल म्हणून कमी अन ‘सिर्फ तुम’ मधील साधी सरळ
मुलगी म्हणून जास्त लोक
ओळखतात. प्रियाच्या अभिनयाचे अन लूकचे त्याकाळी खूप कौतुक झाले होते. तिच्या भोळ्या भाबड्या भूमिकेला लोकांनी खूप पसंती
दर्शविली होती. प्रियाने 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’
या चित्रपटातून अर्षद वारसीसोबत
बॉलिवूडमध्ये आपला प्रवास सुरु केला होता. पण हा चित्रपट काही जास्त चालला नाही. प्रियाला सर्वाधिक ‘सिर्फ तुम’ या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. ‘सिर्फ तुम’ आणि ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटांव्यतिरिक्त प्रिया शाहरूख खानच्यासमवेत ‘जोश’ या चित्रपटात दिसली होती.
सोबतच ती
दक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका करू लागली, तीने मल्याळममध्ये ‘मेघम’ केला. तर तिने भोजपुरी चित्रपटातही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये
प्रियाने जवळपास १० वर्षे काम
केले पण तिने तेरे मेरे सपने,
सिर्फ तुम आणि जोश यासारखे लक्षात राहणारे अन हिट असे सिनेमे दिले. शेवटी ती
भैरवी नावाच्या सिनेमात दिसली. प्रिया अक्षरशः गायबच झाली ती सोशल मीडियावरही नाही. तिने लग्न केले का? ती सध्या काय करते हेही कुणाला
माहिती नाही. काही माहितीनुसार ती भारताबाहेर राहते पण ही माहितीही संपूर्ण
विश्वासार्ह आहे कि नाही याबद्दल साशंकता आहे.
Post a Comment