जाना था चीन पोहच गये चीन, हि म्हण अनेकांच्या आयुष्यात लागू पडते. एखाद्या ध्येयाचा पाठलाग करताना अनेक जणांना काहीतरी वेगळ गवसत अन त्यात ते महारथी बनतात. मराठीबद्दल सांगायचं झाल तर दिलीप प्रभावळकर हे डॉक्टर पण आपल्या अभिनयाने त्यांनी अनेकांचा रक्तदाब कमी केला. तशीच गोष्ट चला हवा येऊ द्या च्या निलेश साबळे ची !! डॉक्टर अमोल कोळे यांच्याबद्दल तर काय सांगावे, झाले डॉक्टर पण करियर केले अभिनयात, अन आता चक्क राजकारणात यश मिळवलंय.

आता आमचेच पहा कि, आहोत अभियंता.. व्हायचे होते अधिकारी अन लिहितो आहोत लेख !! लिखाणात महारथही येईल म्हणा !! असो... (स्वतःची लाल करण्यात आम्हाला फार स्वारस्य)

आजचा लेख आहे तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल, आहे औरंगाबादेची (संभाजीनगर?) पण बॉलीवूड मध्ये यश मिळवले, स्वतःची जागा तयार केली अन जेव्हा यश तिच्या घरात पाणी भरायला लागले तेव्हा मात्र वेगळीच वाट निवडली. साल होते १९९५ औरंगाबादेतली एक मुलगी मुंबईच्या दिशेने निघाली, मनात होते उत्तुंग अभिनयाचे स्वप्न त्यासाठी कितीही मेहनत करायची तिची तयारी होती. सुरवातीला कष्ट होते. काबाडकष्ट. अगदी छोट्या छोट्या जाहिराती करून तिने दिवस काढले. नाटकांमध्ये कामे केली. अन काही दिवसांनी तिला एक चित्रपट मिळाला.


मयुरी कांगो, मुळची औरंगाबादेची १९९५ ला हि मराठी अभिनेत्री हिंदी सिनेमा 'नसीम' मध्ये दिसली. मराठमोळी अशी ती सर्वांनाच भावली, महेश भट्ट यांना तर तिची अदाकारी फार आवडली अन त्यांनी तिला सिनेमासाठी विचारणाही केली. 'पापा केहते हे' हा चित्रपट अन त्यामधले 'घर से निकलते हि, कूच दूर चालते हि' गाणे आजही लाखो ओठांवर तरळते. मयुरीचे कष्ट संपले होते, आता ती यशाची चव चाखत होती बेताबी, होगी प्यार की जीत, अशा अनेक चित्रपटांत तिने काम केले, डझनभर मालिका केल्या. पण मग मात्र तिने यातून काढता पाय घेतला २००३ मध्ये तिने लग्न केले अन परदेशात स्थाईक झाली. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आता अभ्यासाला लागली होती तिने सोफ्टवेयर मध्ये पदवी घेतली अन त्या क्षेत्रात नोकरी सुरु केली. 2019 मध्ये मयुरीची गुगल इंडिया हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिच्या नेतृत्वाखाली गुगल इंडिया अतिशय सक्षमपणे काम करत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post