म्हटले जाते बॉलीवूडवर तीन खानंचे राज्य आहे, त्यात आपल्या काळजीपूर्वक बनवलेल्या चित्रपटांमुळे अन परिपूर्णतेची मागणी करणारा अभिनेता म्हणून मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान याच वेगळ अस स्थान आहे. पण आजचा लेख हा अमीर खान याची मुलगी इच्याविषयी आहे

इरा खान हि आमिर खानची मुलगी आहे, तिचा जन्म मे १९९८ रोजी झाला. अमीर खान याची पहिली पत्नी रीना दत्ता इच्यापासून इरा खान हि झालेली मुलगी आहे. या पत्नीपासून त्याला जुनैद नावाचा एक मुलगाही आहे जो इरापेक्षा मोठा आहे. इरा सोशल मीडियावर फार सक्रीय असते, त्यात इन्स्टाग्राम तिचे आवडीचे आपल्या आयुष्यात काय सुरु आहे त्याबद्दल फॉलोअर्सना ती इन्स्टावरून माहिती देत असते.

इरा आमिरची एकुलती एक मुलगी आहे, एकदा जेव्हा तिने वडिलांना आपण मित्र-मंडळींसोबत युरोप फिरायला जात असल्याचे सांगितले. तेव्हा एका बापासारखीच आमिरला स्वाभाविक चिंता वाटली. पण मुलगी आता मोठी झालीय त्यामुळे त्याने परवानगी दिली. अमीर अन इरामधेही अत्यंत जवळीकीच बाप-लेकीचे नाते आहे, इराच्या २१ व्या वाढदिवसाला आमिरने त्याच्या इन्स्टाग्रामवर तिच्यासोबतच फोटो पोस्ट केला होता.

"२१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इरा. इतक्या लवकर तू मोठी झालीस यावर विश्वास बसत नाहीय. तू नेहमीच माझ्यासाठी सहा वर्षाची राहशील" अस कॅप्शन त्याने याखाली लिहले होते.

जुनैदला थिएटरमध्ये जास्त रस आहे, राजकुमार हिरानीच्या PK या चित्रपटात तो सहाय्यक दिग्दर्शक होता. इरा खान अजूनतरी बॉलीवूडमध्ये आलेली नाही अर्थात ती भविष्यात नक्कीच येईल एका ग्रीक नाटकाचे तिने डायरेक्शन केले आहे. वडिलांप्रमाणे इराचा सुद्धा सर्जनशीलतेकडे ओढा आहे. लहानपणापासून संगीत तिला विशेष आवडते.


Post a Comment

Previous Post Next Post