गेले वर्ष तळकोकणात अन गोव्यात घालवलं, कोकण अन राजकारण म्हटलं कि नारायण राणे या नावाला पर्याय नाही. राणे जिंकू अथवा हरू पण इथले राजकारण मात्र नारायण राणे या नावाभोवतीच फिरते. कणकवली गावचा तुमच्या आमच्या सारखा सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा शिवसेनेत जातो काय अन चक्क मुख्यमत्री होतो काय.. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, गर्भश्रीमंत घरातीलही नाही, तरीही राणेंचा हा झंजावात उल्लेखनीयच म्हणावा.

शिवसेनेच्या राज्यात लॉकडाऊन चालू आहे, अन म्हणून अनेक पुस्तके ओघाने हाताखालून जायला लागली. योगायोगानेच म्हणा पण शिवसेनेच्या पूर्वीच्या नेत्याच 'झंझावात' वाचण्यात आले. [लेखाचा स्रोत- झंजावात, नारायण राणेंचे आत्मचरित्र]

शिवसेना, कॉंग्रेस अन अप्रत्यक्षरित्या म्हणाल तर भाजपही.. या सर्व पक्षांमध्ये जाऊन आल्यानंतर नारायण राणेंनी स्वाभिमान पक्ष स्थापन केला. स्वाभिमानी पक्षाला म्हणव अस यश मिळाल नसतानाही राज्यसभेची खासदारकी मिळवण्याची कला मात्र राणेंनी लीलया साधली.

'झंजावात' च्या निम्मित्ताने एक वेगेळे नारायण राणे आम्हाला सापडले. राजकारणात गरुडझेप घेणारा अन संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असणारा नेता आपल्या तारुण्यात म्हणे चक्क प्रेमात पडला होता. खुद्द रानेनंची त्यांच्या झंझावात पुस्तकात त्यांच्या आयुष्याच्या काही कोवळ्या जागा जगासमोर आणल्या आहेत..


शिवसेनेचा उभारीचा काळ म्हणजे सत्तरच दशक चालू होते. नारायण राणे तारुण्यात होते, त्यांच्या घरासमोर एक बिल्डींग होती. या इमारतीतली उषा विचारे नावाची मुलगी नारायण राणेंच्या नजरेत भरली. अन जिद्दी राणेंनी ठरवले कि संसार करायचा तो उषाताईसोबतच. नारायण राणेंनी हा विषय घरात बोलून टाकला अन राणेंच्या कुटुंबियांनी लग्नाची रीतसर मागणीच घातली. उषाताई आता राणे घराण्याची सून होत्या, लग्नानंतर त्यांच्या नाव बदलवून नीलम असे करण्यात आले. नीलम व नारायण ही तरूण वयाची ही जोडी आजतागायत एकमेकांच्या सुखदुखा:त सोबत आहे. नारायण राणे आपल्या झंझावातआत्मचरित्रात निलमसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणाने सांगतात "नीलम आजही माझी जवळची मैत्रीण आहे. सुरवातीपासूनच छोट्या मोठ्या गोष्टीत मला तिची साथ मिळते. आपलं मत कितीही वेगळं असल, तरिही ते सांगायला तीन कधी कच खाल्ली नाही".

"वैयक्तिक, राजकीय आणि आर्थिक बाबतीतही ती मला सहाय्य करते. ती वाघिणीसिरखी निर्भय आहे. रोज जेव्हा निलेश आणि नितेश ला पाहतो. तेव्हा त्यांचा मला अभिमान वाटतोच, पण त्याहून जास्त त्यांना घडवणाऱ्या निलमचा वाटतो. धकाधकीच्या राजकारणात मला मुलांकडे लक्ष देता आल नाही, पण निलमनं याची कधी तक्रारही केली नाही." उषाताईशी लग्न करणं, हा आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय असल्याचं राणे पुस्तकात मान्य करतात.


Post a Comment

Previous Post Next Post