अनेक राज्यांत मजूर आपल्या गांवापासून हजारो किलोमीटर दूर अडकून पडले आहेत. हे मजूर इतक्या मोठ्या संख्यने प्रत्येक राज्यात आहेत कि कितीही वाटले अन केले तर सरकारचे प्रयत्न तोकडेच पडत आहेत. अशावेळी मजूर धरतात तो अश्मयुगीन मार्ग, चालत आपल्या घराकडे निघण्याचा. मोठमोठ्या पदयात्रा करून प्रत्येक राज्यातले गलीव्हर्स आपल्या घरी पोचण्याच्या घटना रोज वाचावयास मिळतात.

हैदराबादमध्ये कामाला असणारा मुळचा बालाघाट इथला मजूर जवळपास ८०० किलोमीटरचे अंतर पायी चालत आपल्या घरी पोहोचला. त्याच्या सोबत त्याची दोन वर्षाची लहानगी अन पत्नी जी गर्भवती होती. पत्नीला अन लहानगीला इतके लांब कसे चालवत नेणार पण जावे तर लागणारच तेव्हा या मजुराने वाटेत लाकूड आणि बांबूच्या सहाय्याने एक गाडी तयार केली. या गाडीवर पत्नी आणि मुलीला बसवून ती ओढत त्याने ८०० किलोमीटरचे अंतर कापले. रामू आपल्या दोन वर्षांच्या मुलीला आणि गर्भवती पत्नीला एका लाकडाच्या गाडीवर बसवून ती ओढत हैदराबादहून निघाला अन १७ दिवसांचा प्रवास करत बालाघाटमध्ये पोहोचला. जिल्ह्यातील राजेगाव सीमेवर हे दाम्पत्य गर्भवती पत्नीसह पोलिसांना दिसले.

जेव्हा पोलिसांनी पहिले तेव्हा लहानगीच्या पायात चप्पलही नव्हती, पोलिसांनी तिला बिस्किटे आणि चप्पल दिली मग पोलिसांनी घरी जाण्यासाठी एका खासगी गाडीची व्यवस्था केली. त्यानंतर घरी आल्यानंतर रामूने सांगितले की, घरी परतण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर पायी चालत येण्याचा निर्णय घेतला होता. लांजीचे SDOP नितेश भार्गव यांनी सांगितले की, "हा मजूर बालाघाट सीमेजवळ दिसला. तो आपली पत्नी धनवंतीसोबत हैदराबादहून पायी चालत येत होता. त्यांच्यासोबत एक २ वर्षांची मुलगीही होती. अन  तिला लाकडी गाडीत बसवून ती ओढत इथपर्यंत आला होता. आम्ही त्याच्या मुलीला चप्पल आणि बिस्किटे दिली, त्यानंतर त्यांना एक खासगी गाडीमधून सीमेजवळील खेड्यात पाठविले आहे."


Post a Comment

Previous Post Next Post