पंचपक्वान नाव ऐकलय, अस जेवण ज्यात पाच प्रकारचे भोजन असते अन हे शरीराच्या संपूर्ण गरजा पूर्ण करते. आधुनिक भाषेत सांगायचं झाले तर बायोलॉजीमध्ये सांगतात तसे आहारात दुध, अंडी, फळे यांचा समावेश असावा. आजकालतर अनेक वेगवेगळ्या भाज्या बाजारात दिसायला लागल्या होत्या, किवी, ड्रगनफ्रुट असले फळ तर आजकाल छोट्या गावातसुद्धा पोचलेत. अनेकदा लोक त्यांचे फायदे माहिती करून घेण्यापेक्षा ही फळे, भाज्या महागड्या असल्याकारणाने एक स्टेटस सिम्बॉल म्हणून घेतात. पण अशा सर्वांच्या तोंडचे पाणी आज आपण पळवणार आहोत, तेव्हा हा लेख नक्की share करा अन पाहुद्या खरच हि भाजी विकत घ्यायची हिम्मत करतात का ते !

हॉप शुट ही बहुतेक जगातील सर्वात महागडी भाजी !! या हाँप शुटची किंमत युरोपमध्ये 1000 युरो प्रतिकिलो आहे. आपल्या चलनात बोलायचे झाले तर ८० ते ९० हजार रुपये किलो इतकी जबरदस्त महाग हि भाजी आहे. प्रामुख्याने बेल्जियम आणि हाँलंड या देशातल्या लोकांना हि भाजी आवडते अन तिचा बहुतेक खप याच देशांमध्ये आहे. (इची थोडी अजून माहिती घेऊन, आमच्या पडीक शेतात लावावी म्हणतो... ) हाँप शुट ही बारमाही भाजी आहे आहे पण हिवाळ्यामध्ये या भाजीचे उत्पादन घेणे अवघड त्यामुळे मार्च ते जून या काळात हिचे बहुतांश उत्पादन होते.

रोजच्या आहारात या भाजीच्या फांद्यांना कांद्याप्रमाणे सँलडमध्ये टाकून वापर करतात, तिला ग्रील करूनही खाल्ले जाते किंवा लोणच्यामध्ये तिचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच बियर बनवताना एक विशिष्ट स्वाद व गंध येण्यासाठी केला जातो. या भाजीचा शोध लागला तो अकराव्या शतकामध्ये तेव्हा त्याचा सर्वात प्रथम वापर हा बियर मध्ये एक विशिष्ट चव येण्यासाठीच केला गेला पण हळूहळू ती स्वयंपाकघरातही घुसली, तिला आयुर्वेदिक वनस्पती म्हणून ओळखले जाऊ लागले. सांगितले जाते हि हाँप शुट या वनस्पतीमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात जे त्वचेला चिरतरुण ठेवण्यासाठी मदत करतात अन त्वचेवर होणारी जळजळ सुद्धा हाँप शुटच्या सेवनामुळे नाहीशी होते अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये इच्छा वापर केला जातो, तिच्यात उपजतच असणाऱ्या तेलामुळे ती केसांच्या आरोग्यासाठीही उपयोगी आहे, कोंडा अन केस गळण्यावरील उपाय म्हणून तिचा वापर केला जातो. मानसिक आरोग्य, शरीरातील नसा मोकळया करणे, हायपरटेन्शन, झोप न येणे अशा व्याधींसाठीसुद्धा या भाजीचा उपयोग केला जातो. दातांच्या दुखण्यावर खूप पूर्वीपासून वापरतात.

Post a Comment

Previous Post Next Post