बॉलीवूडमध्ये काही अभिनेत्र्यांची चलती असते तर काही आपल्या पदार्पणातच लक्ष वेधून घेतात. अशीच एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे जिने सुरवातीला वेबसिरीजमधून तर त्यानंतर चित्रपटामधून चाहत्यांच्या काळजाचा वेध घेतला आहे, तुम्हाला लक्षात आलेच असेल कि आम्ही कियारा अडवाणीबद्दल बोलत आहोत.

कियाराने आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका सादर केल्यात. लस्ट स्टोरी, असो कि कबीर सिंग तिने लक्षवेधी भूमिका केल्या हे मात्र नक्की. पण एक आगळावेगळा रेकॉर्ड तिने कबीर सिंग चित्रपटाच्यावेळी केला आहे म्हणे, तिने चक्क आठ वेळा किसिंग सीन या चित्रपटात केले आहे. पण हे किसिंग सिन देणे हे तिच्यासाठी तितके सोपे नवते. घरी काय बोलतील ? त्यांना हे पटेल का ? असे सर्वसाधारण प्रश्न तिच्यासमोरही होते. म्हणून कि काय तिने याबद्दल वडिलांना विचारले. वडिलांनी परवानगी दिल्यावरच तिने हे सीन चित्रित केले.

संदीप वंगा यांनी दिग्दर्शित केलेल्या कबीर सिंग हा त्यांनीच बनवलेल्या अर्जुन रेड्डी या दक्षिणात्य चित्रपटाची जशीच्या तशी कॉपी आहे. या चित्रपटात प्रमुख कलाकार म्हणून शाहिद कपूर व त्याच्या अपोझीट कियारा अडवाणी हिने काम केले आहे. उत्कट प्रेम व त्यानंतर प्रेमभंग यामधल्या आजच्या नायकाची कहाणी या चित्रपटात आहे. या चित्रपटात कियाराने हे सीन दिलेले आहेत. कियारा खूपच क्युट अशी अभिनेत्री आहे व मिळालेल्या कामात स्वताला झोकून देण्याची तिची हातोटी आहे. कबीर सिंग तर सुपरहिट ठरला. तिची वेबसिरीज लस्ट स्टोरीज सुद्धा खूप पहिली गेली, त्यानंतर तिची गिल्टी नावाची सिरीजही आली, प्रत्येक ठिकाणी तिने उत्कृष्ट काम केले आहे.

 27 वर्षाची कियारा सध्या आपल्या करियरमध्ये खूप प्रगती करतेय अन तिच्याकडे अनेक चित्रपट अन सिरीज यांच्या भूमिका आहेत. एम.एस.धोनी (द अनटोल्ड स्टोरी) या चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या तिने नंतर मशीन, लस्ट स्टोरी, कलंक, गुड न्यूज, गिल्टी व अंग्रेजी मिडीयम या सिनेमांमध्ये भूमिका केलेल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post