बकासुराचे नाव ऐकलय ?? महाभारताच्या वेळी एक असा राक्षस होता जो गाडीभर जेवण करायचा. नंतर हे नाव खूप जास्त खाणाऱ्या लोकांसाठी वापरले जायला लागले. कोरोनाच्या धामधुमित असाच एक बकासुर सापडला आहे. कोरोनामुले अनेक प्रवासी कामगार आपल्या आपल्या गावाला परतत आहेत. सरकारी नियमानुसार त्यांना १४ दिवस क्वारन्टीन सेंटर मध्ये ठेवले जाते.

अशाच एका क्वारन्टीन सेंटर मधला माणूस काही दिवसांपासून चर्चेत आला आहे, २३ वर्षाचा हा युवक इतके खातो को सगळे क्वारन्टीन सेंटरपरेशान झाले आहे. एका वेळी तो १०-१० लोकांचे जेवण जेवतो.

अनुप ओझा नावाचा हा युवक बिहारमधील बक्सर मधल्या मंझावारी सेंटर मध्ये आहे, पण या युवकाच्या आहाराने भल्या भल्यांना हैराण केले आहे. एकता १० लोकां इतके तो जेवतो, सकाळी नाश्त्याला तो ४० चपात्या आणि १० प्लेट भात खातो. बिहारमधला एक पदार्थ लीट्टी, तर ८०-९० एका बसनी तो संपवतो. सेंटरमधला आचारी त्याच्या या खाण्याने परेशान झाला आहे, अन त्याने चक्क वरिष्ठांना याबद्दल तक्रार केली आहे. Block Development Officer (BDO) अजय कुमार सिंह यांना जेव्हा याबद्दल कळले तेव्हा ते सेंटर ला पोचले अन या युवकाच्या खाण्याचे किस्से ऐकून दंग झाले. अनूप लॉकडाउन च्या आधी काम करण्यासाठी राजस्थान मध्ये गेला होता अन लॉकडाऊन चौथ्यांदा वाढवला गेला तेव्हा तो परत आला. तो खरहा टांड गावाचा रहिवासी आहे, सुमारे १० दिवसांपूर्वी त्याला या सेंटर मध्ये आणले गेले होते.

काही शोधांनी सांगितले आहे कि चिंतेमुले माणूस अधिक जेवण करू लागतो. स्ट्रेस मध्ये Cortisol नावाचे हार्मोन अधिक प्रमाणात सरावते म्हणून माणसाला अधिक खावेसे वाटते, कदाचित अनुपलाही असाच काहीतरी होत असावे.

Post a Comment

Previous Post Next Post