इतिहासाच्या पानांमध्ये अनेक राजे, महाराजे, नवाब, सुलतान याचं ऐश्वर्य, त्यांचे शाही अंदाज लिहिले गेले आहेत. भारतातले राजे राजवाडे त्यांच्या अय्याशी अन चित्र विचित्र सवयींसाठी भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध होते. एका राजाने म्हणे कचरा फेकण्यासाठी रोल्स रॉयस विकत घेतली होती तर एकजण म्हणे तर डायमंडचा पेपरवेट वापरत होता.
पण च्यायला असा एक नवाब होता, जो या सगळ्यांनासुद्धा तोंडात बोटे घालायला लावेल, जुनागडाचा नवाब.. तोच तो, ज्याला जुनागड पाकिस्तानात मिळवायचे होते अन पटेलांनी डोळे वाताराल्यावर जो पाकिस्तानला पळून गेला होता.
जुनागड भारताच्या अन गुजरातच्या पश्चिम भागात आहे. या जुनागडच्या नवाब होता महाबत खान !! याला म्हणे कुत्रांचा फार पुळका होता. तब्बल ८०० कुत्रे याने पाळले होते. या कुत्र्यांना सेपरेट रूम्स होत्या अन प्रत्येकासाठी नोकर अन टेलिफोनसुद्धा होते. एखादा कुत्रा मेला (वारला म्हणावं लागेल, नवाबाला राग यायचा !) तर रिती-रिवाजांप्रमाणे (कुत्र्यांचे कसले रिती अन रिवाज??) त्याला कब्रीस्तानात दफन केले जायचे अन त्याच्या शवयात्रेत शोक संगीत वाजवल जायचं.
नवबाला सगळेच कुत्रे आवडायचे पण त्याची सर्वात आवडती होती, ती म्हणजे रोशना नावाची कुत्री !! इतिहासकार डॉमिनिक लॉपियर अन  लैरी कॉलिन्स यांनी आपल्या फ्रीडम एट मिडनाइटपुस्तकातसुद्धा नवाबाच्या या लहरी विषयी लिहले आहे.

आता या रोशनाच लग्न ठरलं ते बॉबी नाव्ह्या कुत्र्यासोबत. (लव मेरीज होत कि अरेंज? नवाबच जाणो !!) या लग्नाचा खर्च आजच्या हिशोबाने सांगायचा झाल्यास जवळपास २ कोटींपेक्षाही जास्त होता. रोशना च्या लग्नात सोन्याचे ब्रेसलेट, महागडे कपडे सगळ सगळ होत. मिलिट्री बेंड सोबत गार्ड ऑफ ओनर साठी २५० कुत्र्यांनी रेल्वे स्टेशन वर यांच स्वागत केल. महाबत खानाने लग्नाच आमंत्रण राजे राजवाडे अन व्हाईसरॉयला सुद्धा दिले होते. पण व्हाईसरॉय काही आला नाही (जेलसी ??)
जवळपास दीड लाखावर लोक या लग्नात सामील झाले होते, या लग्नावर इतका खर्च झाला कि त्यावेळच्या जुनागडच्या ६ लाख २० हजार जनासंखेच्या जवळपास सगळ्या गरजा पूर्ण झाल्या असत्या.

Post a Comment

Previous Post Next Post