इरफान खान ने 2018 मध्ये आपला सिनेमा ब्लैकमेलरिलीज व्हायच्या आधी एक ट्वीट करून सांगितले होते की त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. त्याला न्यूरोइंडोक्राइन ट्यूमर नावाचा अत्यंत दुर्मिळ असा रोग झालाय. फेब्रुवारी २०१९ मध्ये इरफान परत भारतात परतला अन कामात मन गुंतवून घेतले. २०१७ मध्ये त्याचा एक सुंदर असा सिनेमा आला होता 'हिंदी मेडियम' याच सिनेमाचा सिक़्वल होता 'अंग्रेजी मेडियम'. या सिनेमाचा ट्रेलर येणारच होता पण त्याआधी आला इरफानचा एक विडीयो. या विडीयो मध्ये त्याने अनेक भावनिक गोष्टी केल्या, त्याही त्याच्या स्टाईलने.

या विडीयोमध्ये इरफान सांगतोय कि त्याच्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे, कारण आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात त्याने ही भूमिका केलीय. त्याला तितक्याच जोशात या चित्रपटाला प्रमोट करायचं आहे पण तो अजून पूर्ण ठीक नाही झाला. त्याच्या शरीरात काही अनवॉन्टेड गेस्ट्सम्हणजे बिन बुलाए मेहमान अजूनही होते. अन त्याच्या विरोधात काम चालू आहे. त्यामुळे तो या प्रमोशन पासून दूर आहे.
'दगी जब आपको नीबू दे, तो उसकी शिकंजी बना लेनी चाहिए', अशी एक म्हण हिंदीमध्ये प्रचलित आहे या म्हणीला स्वताशी जोडताना तो म्हणतो 'कहते- जब आपको ज़िंदगी नीबू दे देती है, तो उसकी शिकंजी बनाना इतना भी आसान नहीं होता'. जाता जाता तो म्हणतो 'मेरा इंतजार करीएगा !!"
च्यायला डोळ्यात पाणी आणणाराच हा संदेश आहे. मृत्यू हे असे सर्वव्यापी सत्य आहे, जे तुमच काम, आयुष्य, तुमच्या सगळ्या गोष्टींना एक मोठा पूर्णविराम लावून जाते.

Post a Comment

Previous Post Next Post