मराठी चित्रपटसृष्टी बोल्ड कथांसाठी जास्त प्रसिध्द, पण च्यायला या वेबसिरीजच्या जमान्यात आता मराठीमध्ये बोल्ड सीन्सचीसुद्धा भरमार पाहायला मिळते. काही काळापूर्वी अगदी सोवळ्यात असणारी मराठी चित्रपटसृष्टी आता काहीतरी वेगळ रूप घेतेय. सई ताम्हणकर, राधिका आपटे, छोटी सोनाली कुलकर्णी यांच्या पावलावर पाउल ठेवून अनेक मराठी अभिनेत्या आता बोल्ड सिन्स देत आहेत यात आता मराठीमधील आघाडीची नाईक तेजस्विनी पंडीत इची भर पडलेली आहे. (अन हो, काळे धंदे वाली नेहा राहिलीच !!)
तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीचा हा नवा अवतार कसा वाटतो? कमेंट करून नक्की सांगा... कमेंटमध्ये आम्हालाच च्यायला मायला करू नका म्हणजे झाल.
तुम्ही दुनियादारी पाहिलाय का?? नक्कीच पहिला असेल. पण कितीजणांनी 'दुनियादारी' वाचलंय ? मोजकेच लोक असतील ना ? तर दुनियादारी हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरी वर आधारित होता. अर्थात चित्रपटापेक्षा पुस्तकांचा आवाका भन्नाट, अन भव्य त्यामुळे हे एक अप्रतिम पुस्तक आहे, अन चित्रपट म्हणाल तर त्याच थोडासा अंश !!
तर याच सुहास शिरवळकरांनी आणखीही अनेक पुस्तके लिहिलीत, सगळी एकास बढकर एक. त्यांनी एक असाच एक गूढकथेवर आधारित असलेल पुस्तक लिहील 'समानानंतर'. हेही एक सुंदर पुस्तक MX प्लेयर ने या पुस्तकावर आधारित एक वेब सिरीज बनवली, अर्थात सुहास शिरवळकरांच्या पुस्तकांचा नायक होण्याच महासौभाग्य स्वप्नील जोशीलाच मिळाल तर नाईका बनली आघाडीची नटी तेजस्विनी पंडीत.

स्वप्नील जोशी अन तेजस्वीनी नवरा बायको आहेत, स्वप्नीलच्या जीवनात अनेक घटना होतायेत ज्या कधीतरी दुसऱ्या कुणाच्यातरी आयुष्यात जशाच्या तशा घडून गेलेल्या आहेत. कथेत स्वप्नील कामाच्या गावाहून जेव्हा बायको मुलांकडे येतो तेव्हा उतावीळ झालेली बायको म्हणजे तेजस्विनी पंडीत अन स्वप्नील मधल्या नात्यातला एक नाजूक क्षण दाखवला गेला आहे.
च्यायला च्या भाषेत सांगायचं झाल तर सार्वजनिक जीवनात याला चुंबन (हे कोण म्हणत का?? ) kiss किंवा त्यापुढे जाऊन Smooch !!
आता या सीनमुळे समांतर च्या कथेपेक्षा या सिनचीच चर्चा सुरु आहे. आंबट शौकीन हा विषय चौकाचौकात (sorry व्हिडियो call वर !) चघळताना दिसतायेत. समानानंतर ची गोष्ट पहिल्या पर्वत अर्धीच राहिली अन याच दुसर सीजन सुद्धा येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post