मनोरंजन विश्वावर कोरोनाचा प्रभाव पडला नसता तर नवलच !! कोरोनामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण बंद पडले अशाने नवे एपिसोड येणे बंद झाले. अन यातच टीवीवर रामायण अन महाभारत यांच पुनःप्रक्षेपण सुरु झाल. या मालिकांच्या पुनरागमनामुळे, यामधील पात्रांच्या बद्दल लोकांमध्ये उत्सुकता शिगेला पोचली.
नाहीतरी च्यायला आपल्या लोकांना दुसऱ्याच्या खिडकीतून डोकायची भारीच हाउस असते म्हणा. च्यायला आपण सुद्धा हेच करायला लागलो कि !!
यात रामायणातले राम, लक्षमण, सीता, रावण सगळेच आले आता महाभारतात द्रौपदीची भूमिका साकाणारी नटी रुपा गांगुली ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आली आहे. महाभारतात द्रोपदी बनलेली रुप गांगुली तिच्या करियरसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. तिने आयुष्यात अनेक चढउतार पहिले.

1992 मध्ये रूपाने धुब्रो मुखर्जीसोबत लग्न केल, सगळकाही ठीक होत, एक गोंडस मुलगाही त्यांना झाला होता. पण मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या संसाराला कुणाची नजर लागली, काय माहिती. त्यांच्यात आता मतभेद व्हायला लागले, प्रसंगी भांडणेही झाली. १४ वर्ष कसातरी संसाराचा गाडा ओढल्यानंतर ते २००७ मध्ये वेगळे राहायला लागले अन २००९ मध्ये ते अधिकृतपणे विभक्त झाले.
रुपा गांगुलीनं आपल सगळ करियर संसारासाठी सोडून देऊन कोलकात्याला शिफ्ट झाली होती, अन एक उत्तर गृहिणी म्हणून जगत होती. पण तिला रोजच्या खर्चासाठीही पैसे मिळेनात. भांडणाला कंटाळलेल्या रूपाने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला.
ध्रुबो मुखर्जीपासून घटस्फोट घेतल्यावर रूपा स्वतःपेक्षा 13 वर्षांनी लहान असलेला गायक बॉयफ्रेंड दिब्येंदु सोबत मुंबईत तिच्या फ्लॅटवर राहत होती. पुढे जाऊन तिने दिब्येंदु सोबतही नातं तोडलं. मात्र जेव्हा ती दिब्येंदुसोबत राहत होती त्यावेळी तिचा घटस्फोट झाला नव्हता.
२००९ मध्ये आलेल्या रिअलिटी शो 'सच का सामना' मध्ये तिनं तिच्या खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले. 
महाभारत वगळता तिने हिंदीमध्ये 'साहेब' (1985), 'एक दिन अचानक' (1989), 'प्यार के देवता' (1990), 'बहार आने तक' (1990), 'सौगंध' (1991), 'निश्चय' (1992) आणि 'बर्फी' (2012)या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post