कोरोनाबद्दल अस सांगितलं जात कि, कोरोना अर्थात कोविड-१९ या रोगाचा प्रभाव लहान मुले अन म्हाताऱ्या माणसांवर जास्त होतो. अन अनेक ठिकाणच्या संख्याशास्राने हे दाखवूनही दिले आहे.पण च्यायला !! अस एक माणूस आहे, ज्याने हे सगळ खोटे ठरवले आहे. फक्त कोरोनाच नव्हे तर स्पानिश फ्लू अन वर्ल्ड वार यांनाही त्याने मात दिली आहे.इटलीमधी रीमिनी नावाचे एक शहर आहे, इथे राहतात तब्बल १०१ वर्षांचे एक आजोबा. १९१९ मध्ये महाशय 'पी' यांचा जन्म झाला. १९१९ मध्ये जग कोरोनासारख्याच एक जागतिक महामारीसोबत झुंजत होता. लहानग्या 'पी'चे वाचणे तर अत्यंत कठीण कारण अशी महामारी यापूर्वी जगाने पाहिली नवती. अन या महामारीचे उगमस्थान इटलीच्या अन त्यातल्यात्यात रीमिनीच्या अगदी जवळ म्हणजे स्पेनमध्ये. आज जवळपास सर्वच देशांमध्ये सुसूत्रता आहे, वैद्यकीय संस्था आहेत पण त्याकाळी या गोष्टी दुरापास्त त्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट.या स्पेनिश फ्लू मुले एकट्या इटली मध्ये तब्बल ६ लाख लोक मारले गेले. पण लहानगा पी मात्र सुरक्षित राहिला. यानंतर काही दशकाने आले ते दुसरे महायुद्ध. सर्वांना माहितीच आहे, जर्मनी, जपानबरोबर इटली हा युद्धाचा एक धुरी होता अन युद्धात सर्वाधिक नाश पावलेल्या राष्ट्रांमध्ये होता. महायुद्धात तब्बल २ लाखांहून अधिक नागरिक मारले गेले, पण पी मात्र सुरक्षित राहिले.अन या पीचा यावर्षी सामना झाला तो महाभयंकर कोरोनाशी. रीमिनीच्या उप महापौर ग्लोरिया लीसी यांनी सांगितले, ६५ वयाच्या वरच्या नागरिकांची वाचण्याची शक्यता अत्यंत कमी होती. जेव्हा त्यांचा रिपोर्ट पोजीटीव आला तेव्हा त्यांची वाचण्याची आशा नवती. मागच्या आठवड्यात त्यांना दवाखान्यात भरती केले गेले, आणि लीलया त्यांनी कोरोनाला पराभूत केले

Post a Comment

Previous Post Next Post