Blogger म्हणजे काय ? तर हा एक प्रकारचा व्यापारी ! जो online व्यापार करतो. या व्यापारामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू तो विकतो. काही blogger स्वतःच ज्ञान विकतात, लोकांपर्यंत पोहचवतात. काही विविध प्रकारच्या services विकतात. काही product विकतात. Tech Blogger च उदाहरण घेऊयात.... एक Tech Blogger विविध प्रकारचे gadgets (Mobiles, Electronic Things) पाहतो.. निरखतो... अन त्यातले गुण-दोष आपल्या blog मधून लोकांपर्यंत पोहचवतो. या
कामातून त्याला विविध प्रकारांमधून पैसे मिळतात. अर्थान Blogger बनणे ही खूप सोप्पी अशी गोष्ट नाही. ३ वर्षापूर्वी जितके लोक या क्षेत्रात होते त्यापेक्षा दीडपट लोक आज Full Time Blogger म्हणून काम करत आहेत. blogger बनण्यासाठी मेहनत, ज्ञान, लिहिण्याची पद्धत यासोबतच संयम आवश्यक असतो. अन या गोष्टींच आवश्यक रसायन बनल कि मग तो blogger म्हणून यशस्वी होतो अन त्याला खूप प्रसिद्धीही मिळते. पण blogging पलीकडे त्याच एक वेगळ जग असत जे सगळ्यांसारखच असत.

Boyfriend Blogger असण्याचे फायदे ?

काही मुलींचे Boyfriend डॉक्टर असतात, काहींचे इंजीनियर, पण कुणाचा BF blogger असेल ती मात्र खूप नशीबवान असेल कारण Blogger हे इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा जास्त चांगले जोडीदार ठरतात.

१. धोका मिळण्याचा कमी धोका.

Bloggers ला इतर लोकांसारखे खूप काम असते पण अर्थात ते काम घरी राहून, किंवा एखाद्या निवांत ठिकाणी राहूनही करता येते. तेव्हा Blogger Boyfriend नेहमी तुम्हाला हवा असेल तेव्हा तुमच्याबरोबर असेल.

२. पैसेही भरपूर

Blogging मध्ये आज लोक महिन्याला नव्हे तर आठवड्याला करोडो रुपये कमावतात. Bloggers हे डॉलर्समध्ये कमावतात अन खर्च मात्र रुपयात करतात. अन इथे पैसे कमावण्याच्या अनंत संधी आहेत. भारतात तर ही digital युगाची सुरवात आहे त्यामुळे blogger आपल्या भविष्याबद्दल अत्यंत निश्चिंत असतात.

३. आयुष्यामध्ये नेहमी नवेपण असेल.

Blogging हे कोणत्याही इतर व्यवसायापेक्षा अधिक creative अन Innovative अस काम आहे. त्यामुळे Blogger हे आयुष्यातसुद्धा नवनवीन गोष्टी करण्यात अग्रसेर असतात म्हणून Bloggers आपल्या जोडीदाराला आयुष्यात अनेक Suprises देतात.

४. तुम्हाला नेहमी वेळ देईल.

डॉक्टरला कधी emergancy येईल सांगता येत नाही, इंजीनियरला सुद्धा नियोजित सुट्टी मिळेल अशी सुतराम शक्यता नाही. पण Blogger त्याच्या जोडीदारासाठी नेहमी वेळ काढू शकतो. किंवा कुठे ट्रीपला गेल्याने त्याचे कामही अडत नाही.

५. नवनवीन भेटवस्तू मिळतील

Bloggers नेहमी online काम करतात त्यामुळे नवीन काही वस्तू आली तर त्यांना लगेच कळते अन त्या Gadget बद्दल जाणून घेण्याची त्यांची नवलाईसुद्धा असते म्हणून Bloggers च्या घरात नेहमी नवनवीन वस्तू येत राहतील.

६. नात्यांची समज असल्याने, नात्यांची किंमत कळते.

इतर व्यवसायासारखेच Blogger चं नेहमी त्याच्या वाचकांशी interaction असत पण जिथे एका व्यापाऱ्याचे 100-200 लोकांशी संबंध येतात त्याच्या उलट bloggerचा संबंध हजारो लोकांशी रोज येतो त्यामुळे इतरांच्या तुलनेत blogger हे खूप जास्त समजूतदार असतात अन नात्यांची कदर ही ते जास्त करतात

७. जोडीदाराच्या career मधेही support मिळेल

एका Blogger ने आपल्या आयुष्यात खूप चढउतार पाहिलेले असतात. कधी अत्यंत मेहनतीने लिहलेल्या त्याच्या Blog वर कुणी फिरकतही नसत त्याच्या पोस्ट आज लाखो लोक वाचतात. त्यामुळे जोडीदाराच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post